हिजाबमध्ये अल्ला हू अकबर म्हणणाऱ्या मुलीला ५ लाखांचे बक्षीस

                मंडळी कर्नाटकमधल्या विद्यार्थ्यांमध्ये पेटलेला धार्मिक वाद चांगलाच चिघळतांना दिसत आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांनींना हिजाब घालून शाळांमध्ये प्रवेश नाकारला आहे. या मुद्द्यावरून कर्नाटकमधील धार्मिक आणि राजकीय वातावरण चांगलंच पेटताना दिसत आहे. कर्नाटकमधील पीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे मंगळवारी हिजाब घातलेल्या मुलीला भगवे दुपट्टे गळ्यात घालून आलेल्या काही तरुणांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला.

                   मुलीसमोर तरुणांनी जय श्री राम नावाच्या मोठं मोठ्याने घोषणा दिल्या. तेव्हा एकमेव मुस्लिम मुलीने त्यांचा कडाडून आणि निर्भयपणे विरोध करत अल्ला हूअकबरच्या घोषणा दिल्या. या प्रकरणाचा विडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाल्यामुळे जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने त्या मुस्लिम मुलीच्या धाडसाची दखल घेतली आणि तिला ५ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले. 


                    कर्नाटकमधल हे वातावरण चांगलंच चिघळताना दिसून येत आहे. कुणी हिजाबला विरोध करत आहे तर कुणी भगवा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचा विरोध करत आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष म्हणाले की ज्या मुलीने हिजाबच्या अधिकारासाठी कर्नाटकच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तिचाही आपण सन्मान करू.

                    जमियतचे सचिव नियाज अहमद फारुकी म्हणाले की,

                              “ज्या विद्यार्थीनींनी आपल धाडस दाखवलं त्या सर्वांच कौतुक आहे.”

                      असे ते म्हणाले. मात्र हे हिजाबच चिघळलेल वातावरण हिंदू मुस्लिम दंगलीच स्वरूप घेते की काय?अशी भीती सर्विकडे पसरली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल हे प्रकरण कुठे येऊन थांबतय यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *