राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी कल्याणाला प्राधान्य देणारा शपथनामा..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी कल्याणाला प्राधान्य देणारा शपथनामा…

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी हिताच्या घोषणा केल्या आहेत, घरगुती गॅस ५०० रुपयांपर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आणण्यासाठी विशेष अनुदान आणि जातिनिहाय जनगणना करण्यावर भर देणार असल्याचेही यात नमूद केले आहे. याबरोबर देशासह राज्यातील महिला, विद्यार्थी, आदिवासी, तरुण, पर्यावरण अशा विविध घटकांना रोजगार, सुरक्षितता आणि हक्क देण्यासाठी संबंधित प्रश्‍नांना या जाहीरनाम्यात स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पक्षाचा शपथनामा (जाहीरनामा) गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवक आघाडीचे मेहबूब शेख या वेळी उपस्थित होते. या जाहीरनामा ‘शपथनामा’ असे संबोधन्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथनाम्याती महत्वपुर्ण घोषणा…

  1. शेतकऱ्यांसाठी आधारभूत व्यवस्था निर्माण करणार.
  2. दर पाच वर्षांनी जातिनिहाय जनगणना करणार.
  3. एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा वाढविण्यासाठी घटनेत दुरुस्तीची मागणी.
  4. आरोग्य, शिक्षण, सशस्त्र दल अशा विभागांतील ३० लाख रिक्त जागा भरणार.
  5. कांदा दरात स्थिरता आणण्यासाठी आयात-निर्यात धोरण आखणार.
  6. स्वतंत्र ‘जीएसटी’ परिषद स्थापना.
  7. स्वयंपाक घरातील गॅसच्या किंमती आम्ही कमी करत त्या 500 रुपयांपर्यंत निश्चित करू. त्यासाठी आवशक्यता लागल्यास केंद्र सरकारकडून त्याला सबसीडी देईल.
  8. शासकीय नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा आग्रह करू.
  9. अग्निवीर योजना आम्ही बंद करू.
  10. प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ.
  11. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार.

अजित पवारांनी बहुतांश आमदारांना सोडून भगव्या पक्षाशी (भाजपा) हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. काका शरद पवार यांना मोठा धक्का बसला, अजित पवार यांनी अनेक आमदारांच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यामुळे पक्षात फूट पडली. त्यामुळे लेकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किती जागा जिंकलं या कडे जनतेचे लक्ष आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *