मंडळी आयुष्य म्हणलं की संघर्ष हा अटळ आहे आणि प्रत्येकाच्या वाट्यालाच येत असतो. मात्र त्या संघर्षाचा प्रवास सुखकर समजून यशाला गाठणारी माणसं हे क्वचितच बघायला मिळतात.
त्यापैकीच एक संघर्षशाली व्यक्तिमत्त्व असणारी राजकीय क्षेत्रात एका आदिवासी समाजातून येऊन राष्ट्रपती पदापर्यंत आपली दावेदारी मजबूत करणारी रणरागिणी म्हणजे द्रौपदी मुर्मू.
RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री
मंडळी द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशामधल्या मयुरभंज जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये झाला. त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असे दोन अपत्ये झाली.
मात्र अवघ्या काही कालावधीमध्येच त्यांचे पती व दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या मुलीला योग्य शिक्षण मिळाव यासाठी आणि कुटुंबामधला इतर खर्च करता यावा यासाठी सुरवातीला क्लर्क म्हणून नोकरी केली.
काही काळ क्लर्क म्हणून नोकरी केल्यानंतर नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्राची वाट धरली आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष झाल्या.
१ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास
मुर्मू यांची लोकप्रियता वाढू लागली होती. आणि याच जनतेच्या प्रेमापोटी त्या १९९७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे मुर्मू यांच्या लोकप्रियतेकडे चांगलेच लक्ष होते.
नंतर त्या २००० ते २००४ पर्यंत भाजप आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात राज्यमंत्री राहल्या.
राष्ट्रपती पदासाठी दावेदारी
दिवसेंदिवस मुर्मू यांची लोकप्रियता वाढत होती. त्यांच्या कामामुळे त्यांना जनतेमध्ये आणि भाजपामध्ये एक उत्तम नेतृत्व म्हणून पसंत केल्या जाऊ लागलं. भारतीय देशातील राजकारणात त्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशामधील पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
मुर्मू यांच्या नेतृत्वक्षमतेचा आलेख दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाच्या हिताचा ठरत असल्याकारणाने भाजपने त्यांना २०२२ सालच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी दावेदार म्हणून घोषित केले. आणि त्या इथल्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणास्थान झाल्या.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- २००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?
- “इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?
- महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?
- काय आहे सद्ध्या विवादामध्ये असलेल्या भारतीय राजमुद्रेचा इतिहास?
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir