धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्वाच्या पाठीमागून अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे!

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर, “आम्हीच मुख्य राष्ट्रवादी आहोत” हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे दोनही गट आपापल्या पद्धतीने करताय. सभा, शिबिर, बैठका, मेळावे भरवून दोघं गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक 22 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडली. बैठकीत बोलत असताना अजित पवार बोलले की, “कोणत्याही पक्षासोबत आपली युती झाली तरी धर्मनिरपेक्षता व पुरोगामीत्वाच्या भूमिकेशी आणि फुले – शाहू – आंबेडकर यांच्या तत्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही.” आता यावर कोणी म्हणतय दादांनी बोलताना धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा अधोरेखित करून भाजपाला सुनावले; तर कोणी म्हणतय फुले – शाहू – आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा मुद्दा उचलून शरद पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण खरं तर हे दोघं मुद्दे बरोबर आहेत, कसं ते पाहूया.

तर, अजित पवारांनी “धर्मनिरपेक्षता हे आपलं मुख्य तत्व आहे” असं बोलणं हे भाजपाला पचण्यासारखं नाही. कारण भाजप मंदिर-मस्जिदच्या वादात मंदिराची बाजू घेऊन, जास्तीत जास्त हिंदू आपल्या बाजूने कसे घेता येतील याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळेच गेल्या 30 वर्षापासून भाजपचा पारंपरिक मतदार हा हिंदू असल्याचे दिसते.

पण त्याचं वेळी धर्मनिरपेक्षता पाळणाऱ्या राष्ट्रवादीला, भाजपा सोबत घेणार असेल तर नक्कीच पारंपरिक हिंदू मतदार दुखावला जाईल यात कोणतीही शंका नाही. कारण भारतीय धर्मनिरपेक्षतेचा एक कंगोरा हिंदू मुस्लिम एकतेचा असल्याने तो आजच्या हिंदुत्ववाद्यांना चालणारा नाही.

म्हणजेच अजित पवारांनी, धर्मनिरपेक्षता हा आमचा आत्मा आहे असं बोलणं म्हणजे, जर की भाजपाने राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्षतेला काही आडकाठी आणली, तर युती तोडण्याचा देखील विचार होऊ शकतो. असा अप्रत्यक्ष ईशारा भाजपाला दिला, असे म्हणता येऊ शकते.

याद्वारे अधिवेशन काळात नवाब मलिक प्रकरणामुळे झालेला डॅमेज भरून काढण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला हे मात्र नक्की.

धर्मनिरपेक्षतेवर ठाम पणा घेत, फुले – शाहू – आंबेडकर आणि पुरोगामित्व हे आपले प्रमुख तत्व आहेत, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला. कारण फुले – शाहू – आंबेडकर ही त्रिसूत्री आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेली पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी रुजवली असेल तर ती शरद पवारांनी. त्याचं विचारधारेला अजित पवार शिरसावंद मानणारा असतील, तर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी पसरवलेली वैचारिक चादर, अजित पवार आपल्याकडे ओढताय, हेच यावरून अधोरेखित होते.

पुरोगामित्व सांगण्याचा दुसरा फायदा म्हणजे, महाराष्ट्रात फुले- शाहू -आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना मानणारा एक मोठा वैचारिक वर्ग आहे. जो की शरद पवारांच्या पाठीमागे उभा असलेला, आपण बघितलेला आहे. त्या वर्गाला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न अजित पवार करता आहेत.

म्हणजे अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी, शरद पवारांना सांगितले, की पुरोगामित्व आणि फुले- शाहू – आंबेडकरांच्या विचारांचा ठेका, तुम्ही एकट्याने नाही घेतला. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे, तसंच पक्षाचे वैचारिक वारसदार देखील आम्हीच आहोत.

अजित पवारांच्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेवरून, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि भाजप दोघांना खालच्या पायरीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो, हे भविष्यात कळेलच.
तथापि माहिती कशी वाटली? आपली प्रतिक्रिया नोंदवून नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *