मंडळी या जगामध्ये जगत असतांना काही माणसं असे जगून जातात की समाजामधल्या प्रत्येक माणसाला वाटावं की, जगाव तर अस. असच एक उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मात्र या भारतीय देशाचं दुर्भाग्य अस की या महामानवाला आपण फक्त दलित समाजापर्यंत मर्यादित ठेवलं.
त्यांनी राज्यघटना लिहिली आणि बौद्ध धम्म स्वीकारून त्यांनी दलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला बस एवढंच आपल्याला माहिती आहे. मात्र या समाजमधल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसासाठी झटणारे बाबासाहेब आपल्याला कळलेच नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कामगार नेते होते. स्त्रियांना हिंदू कोडबीलाच्या माध्यमातून पुरुषांइतकाच समान हक्क बहाल करणारे नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. हे कधी आपण वाचलेच नाही.
शेतकरी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मंडळी जेव्हा या देशामध्ये ब्रिटिश सरकारच राज्य होत. तेव्हा त्यांचं म्हणणं होत की, या देशातल्या शेतजमिना ह्या इंग्रज सरकारच्या आहे. त्यावर भारतीय शेतकरी ताबा घेऊन बसलेला आहे. म्हणून इंग्रज सरकार शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करणे, ठराविक कालावधीनंतर तो शेतसारा वाढवणे. अशा अनेक माध्यमातून शेतकऱ्यांच शोषण इंग्रज सरकार करत होत.
मात्र हे धोरण डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हत. शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे. परिस्थितीने ग्रासलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तो शेतसारा कसा भरेल? शेतकऱ्यांच्या अशा अनेक व्यथा डॉ. आंबेडकरांनी 1८ ऑगस्ट १९२५ रोजी ‘ तरुण भारत ‘ या वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखात मांडल्या आहेत. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी झटणारे महापुरुष म्हणजे डॉ. आंबेडकर आहेत.
कामगार नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मंडळी जेव्हा ब्रिटिशांच राज्य या देशामध्ये होत तेव्हा त्यांनी नवीन उद्योगधंदे सुरू केले. ज्यामुळे स्थानिक जनतेच्या हातामधला रोजगार गेला. उद्योगधंदे बंद पडले. म्हणून ब्रिटिशांकडे काम करत असताना भारतीय मजूरांचे खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सरकार शोषण करत होत.
हवा तेवढा वेळ काम करून घेणे. सुट्टी न देणे. पगार कापणे किंवा वेळेवर न देणे. अशा अनेक कठीण संघर्षातून कामगार चालला होता. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महापुरुष भारतीय कामगारांसाठी उभा झाला.
कामगाराच जीवन अनुभवायसाठी डॉ. आंबेडकर बॅरिस्टर असून कोण्या मोठ्या बंगल्यात न राहता कामगार वस्तीमध्ये रहायचे. नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळी उभारून इथल्या प्रत्येक कामगाराला कामाचे तास ठरवून दिले. सुट्टीचा दिवस ठरवून दिला. वेतन योग्य मिळावे यासाठी तरतूद केली.
महिलांनासुद्धा पुरुषांसोबत समान वेतन मिळेल याची तरतूद केली. प्रत्येक स्त्रीला प्रसूतीच्या आधी १० आठवडे आणि प्रसूतीच्या नंतर ४ आठवडे सुट्टी घेण्याची तरतूद केली आणि गुलाम, शोषित झालेला इथला मजूर मजबूत करण्याचं कामसुद्धा डॉ. आंबेडकर यांनी केलं.
मंडळी अशी अनेक महान कार्य डॉ. आंबेडकर यांनी इथली प्रत्येक समाजासाठी केली आहे.
Pingback: जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला... - Political Wazir