अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा भावा…

अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा भावा…कुट्ट्टंबी… पयल्यांदा गांधीबाबापुढं झुकावंच लागतं ! ह्याला म्हन्त्यात विचारांची ताकद !! छाती किती इंचाची ते म्हत्त्वाचं नस्तं गड्या.. त्या छातीत दम आसंल तरच आख्खं जग झुकून सलाम करतं !!!

तू कित्तीबी वरडून बोल – घसा फाडूफाडून बोल – बोटं नाचंव – हातवारं कर… तुझ्या बोलन्यात \’सत्याचा अंश\’ नसंल तर जगाच्या बाजारात तुला घंटा किंमत मिळत नसती सोन्या…

त्या महात्म्याचा आवाज खनखनीत नव्हता का चालन्यात खोटा रूबाब न्हवता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्‍हायचा… आवाजात चढउतार नायत का टाळीबाज-चटपटीत वाक्य नायत… पन त्याच्या विचारात \’निर्मळ\’पना व्हता – शब्दाशब्दात भारतमातेवरची माया व्हती – रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती – मानवतेची कास व्हती – \’सत्याची\’ ताकद व्हती..

गोळ्या घालुन मारला बाबाला… पन तरीबी जित्ता र्‍हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून ! जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय !!

 खायचं काम नाय भावा…

ह्यांच्या हज्जार पिढ्या खपत्याल त्यो \’विचार\’ संपवायला पन \’गांधी\’ उसळी मारून वर येतच र्‍हानार !!!

सलाम महात्म्या सलाम… कडकडीत सलाम..

– किरण माने.

@kiranmane7777 @politicalwazirdotcom @fearless_maratha_official

#FearlessMaratha #mahatmagandhi #maharashtra #india

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *