मंडळी सद्ध्या परळी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार असलेले धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील राजकारणात बहुचर्चित नेत्यांपैकी एक आहेत.
मात्र आपल्या घराण्याला भारतीय जनता पक्षाचा राजकीय वारसा असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसे काय आले? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे…
तर मंडळी झाल अस की, धनंजय मुंडे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे. ते गोपीनाथ मुंडेंचाच हात धरून राजकीय क्षेत्रात आले. त्यांच्यासोबत विविध सभांमध्ये जाणे, संघटन तयार करणे या कारणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियताही मिळाली.
वाढत्या लोकप्रियतेमुळे धनंजय मुंडे यांना २००२ साली जिल्हापरिषद निवडणुकीची भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. आणि ते निवडूनसुद्धा आले.
सण २००२ ते सण २००७ पर्यंत ते जिल्हापरिषद सदस्य होते. धनंजय मुंडे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्षसुदधा केले.
दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली होती. मात्र गोपीनाथ मुंडे यांना प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे अशा दोन मुली होत्या. त्यामुळे जनतेला प्रश्न निर्माण झाला होता की, येणाऱ्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार धनंजय मुंडे असतील की पंकजा मुंडे.
वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी
पण त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना महत्व देण्यात आलं आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत दगा झाला. अस म्हणणं वावग ठरणार नाही.
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मंडळी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांना महत्व दिल्याकारणाने धनंजय मुंडे यांची साफ नाराजी झाली होती. आणि याच कारणावरून त्यांनी अखेर २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या बहिणीकडून म्हणजेच पंकजा मुंडेंकडून पराभव स्विकारावा लागला होता. पण धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी
- आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले
- काय आहे भाजपाचा इतिहास?
- जेव्हा पवारांना प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी जबरदस्तीने मुख्यमंत्री करण्यात आलं…
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir