मंडळी भारतीय देशाला प्रगल्भ लोकशाही लाभण्याच्या अगोदर साप आणि साधूंचा देश म्हणून जगभरामध्ये ओळखलं जायचं. मात्र १९५१-१९५२ या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या निवडणूकीपासून भारतीय देश हा एक प्रगल्भ लोकशाही असणारा देश म्हणून जगभरात ओळखल्या जाऊ लागला.
आज अनेक देशांमध्ये निवडणूका होतात. पण योग्य ती लोकशाही न रुजू झाल्यामुळे अनेक देशांच्या शासनव्यवस्था कोलमडून पडलेल्या आपल्याला दिसतील. आज आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या निवडणूका अनेक प्रकारचे राजकीय पक्ष आपल्या एका विशिष्ट चिन्हावर लढवत असतात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत?
पण या निवडणुका केव्हापासून घेण्यात आल्या? राजकीय पक्षांना चिन्ह कशा प्रकारे दिल्या गेलं? आज या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी भारतीय देशामध्ये पहिली निवडणूक १९५१-१९५२ या साली झाली अस म्हणायची पद्धत आहे.
त्याच कारण अस की, १९५१ सालच्या ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच मतदान झालं. पण खऱ्या बाकीच्या निवडणूका झाल्या १९५२ साली. भारतीय देशाची ही पहिली निवडणूक संपूर्ण जगाच लक्ष वेधून घेणारी होती.
कारण मतदारांची संख्या २० कोटी होती. ज्यामध्ये ८० टक्के मतदार हा निरक्षर होते. या सर्व मतदारांकडून मतदान करून घेण्याची जबाबदारी आणि सर्व निवडणूका निपक्षपातीपणाने पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवल्या गेली होती.
म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…
आणि पाहिले निवडणूक आयुक्त म्हणून आयशीएस अधिकारी सुकुमार सेन यांची नेमणूक करण्यात आली होती. सुकुमार सेन यांनी अतिशय छान पद्धतीने ही पहिली निवडून पार पाडली होती. आणि दुसऱ्याही निवडणूकीला तेच आयुक्त राहले होते.
पक्ष चिन्ह असण्याची कल्पना
मंडळी १९५१-५२ मध्ये पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या जरी २० कोटी होती, तरी त्यामधले ८० टक्के मतदार हे निरक्षर होते. म्हणून अशा मतदारांना मतदान करणे अवघड जाऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाला स्वतःच एक स्वतंत्र चिन्ह देण्यात आलं होतं.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- मर्यादेय विराजते…
- जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…
- आणि अजित पवारांच्या त्या विधानावर संपूर्ण सभागृह हसून उठलं…
- वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक होणाऱ्या फडणवीसांचा राजकीय जीवन प्रवास
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir