मंडळी राज्यसरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाने सम्पूर्ण महाराष्ट्रभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्यसरकारने परवानगी दिल्याने भारतीय जनता पक्षाने राज्यसरकारला चांगलाच विरोध केला होता. मात्र आता जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्यसरकारविरोधात बंड पुकारला आहे.
राज्यसरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी येत्या १४ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यामुळे अण्णांच्या या निर्णयामुळे राज्यसरकारवर दबाव निर्माण होईल की काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अण्णा हजारे यांनी याआधी दिल्लीमध्येसुद्धा जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं. ज्यामुळे सम्पूर्ण देशामध्ये अण्णा हजारे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. अण्णा हजारे यांनी राज्यसरकारला वाईन विक्री निर्णयासंबंधात आधीपण पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी राज्यसरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयासंदर्भात वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांवर जी आमची खरी संपत्ती आहे. ही युवशक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल यावर आमचा विश्वास आहे. या बालकामध्येच उद्याचे महापुरुष निर्माण होणार आहेत. युवशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराचे भविष्य ज्या मुलींना, युवतींना घडवायचे आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी । ती जगाला उध्दारी ।। या युवतींवर या वाईनचे काय दुष्परिणाम होतील. एकूण समाजावर काय परिणाम होईल याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही.” अस अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेल आहे. हे प्रकरण आता पुढे कुठलं वळण घेईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.