महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशयारी जी यांचा राजीनामा मंजूर झाला असून मा. रमेश बैस यांची नियुक्ती राज्यपाल पदी झालेली आहे.महाराष्ट्रा बरोबरच इतर ही काही राज्यातील राज्यपाल उपराज्यपाल बदलले आहेत.
खर म्हणजे कधी नव्हे ते राज्यपाल हे पद गेल्या 4 वर्षात खुप चर्चेत आलं. त्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर बहुतांश वेळा राज्यपालांनी आपल्या अधिकारांची जाणीव महाविकास आघाडीला करून दिली,
त्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारला वेगळी वागणुक देत असल्याचा आरोप केला.वेगवेगळ्या प्रसंगातून तत्कालीन मुख्यमंत्री मा.उद्धव टाकरे ,उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी अनेकदा तशी नाराजी मीडियाला बोलून सुद्धा दाखवली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडून वारंवार होत आला आहे महाराष्ट्राचा अपमान
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर नवीन सरकार स्थापन करताना झालेली घाई,किंबहुना राज्यपालांनी दाखवलेली तत्परता अनेकांच्या भुवया उंचावून गेली.
शिंदे-फडणवीस सरकार यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर महाविकास आघाडी चे शिल्पकार मा. शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यपालांनी शिंदे-फडणवीस यांना पेढा भरवल्याचे अधोरेखित केले,
आजपर्यंतच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवात आपण एकदाही राज्यपालांनी कोणाला पेढा भरविला अस पाहिलं नसल्याचे नमुद केले आणि राज्यपालांच्या निःपक्षपाती वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि चटकन जनतेला देखील राज्यपालांची चूक लक्षात आली.
राज्यपाल नियुक्त 12 आमदार:ततत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांद्वारे नियुक्त होणाऱ्या 12 आमदारांना नियुक्ती सरकार अल्पमतात येईपर्यंत न दिल्याने याही प्रकरणात राज्यपालांच्या निःपक्ष भूमिकेवर आघाडी सरकारने राज्यपाला समोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ,
आजचे विरोधक आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी राज्यपाल कुणाच्या सांगण्यावरून नियुक्ती थांबवत आहे अशी टीका सुद्धा केली.आज राज्यपालांच्या राजीनाम्या नंतर सुध्दा हा प्रश्न प्रलंबीतच आहे असे म्हणता येईल
आणि त्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला…
महापुरुषांचा अपमान:
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना इतरांबरोबर करणारे राज्यपाल नेहमी राजकारण्यांच्या निशाण्यावर असतात,पण छत्रपतींच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्या नंतर सामान्य नागरिकांचा व अनेक शिवप्रेमी संघटनांच्या रोषाला देखील राज्यपालांना सामोरे जावे लागले
अनेक ठिकाणी आंदोलन,चक्काजाम करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजी राजे भोसले यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून तात्काळ राज्यपालांना हटवा या आशयाचे पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या,
उदयनराजे यांना तर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झालेले सुद्धा आपण पाहिले.महाविकास आघाडी ने तर थेट मुंबई आझाद मैदान येथे ईतर मागण्या बरोबर राज्यपाल हटाव या मागणीसाठी विराट मोर्चाचे आयोजन केले अनेक संघटनांनी आणि शिवप्रेमी लोकांनी आपला सहभाग या मोर्चात नोंदवत ऐतिहासिक स्वरूप मोर्चाला प्राप्त करून दिले.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा देखील अपमान राज्यपालकडून झाला
महाविकास आघाडी मधील नवीन मंत्राच्या शपथविधी सोहळ्यात सगळे नियमानुसार करवुन घेणारे राज्यपाल शिंदे-फडनवीस सरकार च्या मंत्रांच्या शपथविधी सोहळ्यात free hand देतांना दिसले,याही प्रकरणात त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
आपल्या 4 वर्ष्याच्या कार्यकाळात अनेक वाद राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी ओढवून घेतले.पण सरकार कुठलेही असो त्यांना शिस्त लावण्याचे काम राज्यपालांनी करून दाखवले यात कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही.
आजपर्यंत च्या सर्व राजपालांपेक्षा वादळी कारकीर्द कोश्यारी साहेबांची राहिली अस म्हणायला वावग ठरणार नाही.मूळचे उत्तराखंड चे असणारे राज्यपाल यांना थंडगार वातावरणाची सवय असतांना देखील,त्यांच्या उपस्तिथीत महाराष्ट्राचे राजकीय तापमान त्यांनी वाढविले ऐवढ मात्र नक्की!
असो,त्यांना येणाऱ्या काळात उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना,आणि नवीन राज्यपालांना मनस्वी शुभेच्छा….
तुम्ही हे ब्लॉग पण वाचू शकता :
- आबासाहेब रघुनाथराव चव्हाण या सक्षम नेतृत्वापासून वंचित राहिलेला महाराष्ट्र
- देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?
- ईव्हीएमचा वाद अन गोपीनाथ मुंडें चा अपघात की हत्या?
- पंजाबराव कदम ते भाऊसाहेब देशमुख भारतीय देशाचे पहिले कृषिमंत्री
तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता :
Facebook : Political Wazir