मंडळी आनंद दिघे हे नाव महाराष्ट्रातील राजकारणाशी निगडित असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला माहित नसेल अस होऊच शकत नाही. आंनद दिघेंना शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आणि ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखल जात होतं.
मात्र दिघेंसोबत मध्यंतरी घडलेली एक घटना अजूनही त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेलं कोडच आहे. आनंद दिघे यांना एका खुनाप्रकरणी अतिरेक्यांवर वापरल्या जाणाऱ्या ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.
जेव्हा आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर घडलेल्या दंगलीत २ निर्दोष जीव गेले…
या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठले होते. विधानसभेमध्येसुद्धा दिघेंच्या अटकेमुळे लोकप्रतिनिधींमध्ये असंतोषाच वातावरण पसरलं होत.
तर मंडळी झालं असं की, १९८९ च्या मार्चमध्ये महानगरपालिका निवडणूका पार पडल्या होत्या. ज्यामध्ये शिवसेनेचे जवळपास ३० नगरसेवक निवडणून आले होते. काँग्रेसचेसुद्धा बरेच नगरसेवक निवडून आले होते. आता वेळ होती ती म्हणजे महापौर पदाच्या निवडणूकीची.
दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?
शिवसेनेने जनता दल पक्षाला सोबत घेऊन महापौर पदासाठी उमेदवार दिला होता. दुसरीकडे काँग्रेसने ‘स्थानिक आगरी सेना’ म्हणून त्यावेळेस एक संघटना होती. त्यांना सोबत घेऊन उमेदवार उभा केला होता. ही लढाई एकदम काट्याची होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी या निवडणुकीची जबाबदारी ठाण्याचे त्यावेळेसचे जिल्हाध्यक्ष आनंद दिघे यांच्यावर सोपवली होती. सोबतच माजी महापौर सतीश प्रधान यांच्यावर या महापौर पदाच्या निवडणूकीची जबाबदारी होती. १९८९ हा तो काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण महाराष्ट्रात दरारा होता.
दुसरीकडे ठाण्यामध्ये आनंद दिघे यांचा. तरीसुद्धा सगळीकडे चर्चा होती की शिवसेनेचे काही मतं फुटणार आहेत. पण बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेब असतांना मतं फुटणार नाही यावर शिवसैनिकांचा प्रचंड विश्वास होता. मात्र झालं वेगळचं. शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार प्रकाश परांजपे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
शिवसेनेच्या नगरसेवकाचा खून
मंडळी शिवसेनेचा ठाण्यातील महापौर पदाच्या निवडणूकीमध्ये अवघ्या एका मताने झालेला पराभव हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि शिवसैनिकांच्या अत्यंत जिव्हारी लागला होता. शिवसेनेतील कुठलातरी नगरसेवक फुटला होता.
आनंद दिघेंची दहशत झुगारून कोणीतरी क्रॉस मतदान केलं होतं. ही बाब बाळासाहेब ठाकरे यांना कळल्यानंतर ते प्रचंड संतापले. त्यांनी दिघे यांना बोलावलं.
“आपली बाजू भक्कम असताना, आपले सर्व आकडे जुडत असतांना आपला पराभव कसा काय झाला?”
या बाळासाहेबांच्या प्रश्नावर दिघे अनुत्तरीत होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना आनंद दिघे यांनी म्हटलं की,
“साहेब गद्दारांना माफी नाही”.
आनंद दिघे यांनी हे स्टेटमेंट समाज माध्यमांवरसुद्धा बोलून दाखवल होत. त्यामुळे त्यांचं हे विधान सगळीकडे चांगलच प्रचलित झालं. त्यानंतरच अवघ्या काही दिवसांमध्ये श्रीधर खोपकर नावाच्या एका शिवसेना नगरसेवकाची काही अज्ञात लोकांनी हत्या केली.
आणि या खुनाचा आरोप आनंद दिघेंच्या स्टेटमेंटनुसार त्यांच्यावरच घेण्यात आला. ज्यामुळे त्यांना ‘टाडा’ या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. दिघेंच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठले होते. काही काळानंतर दिघेंना जामीन देण्यात आला होता. मात्र त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यावर हा खटला चालूच होता. या घटनेपासून शिवसेनेमध्ये “गद्दारांना माफी नाही” हे स्टेटमेंट प्रचलित झालं होतं.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- आनंद दिघे का राहायचे भाड्याच्या घरात?
- असा लागू होतो पक्षांतर बंदी कायदा…
- रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास
- जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir