मंडळी रशिया आणि युक्रेनमधला वाद आता युद्धापर्यंत येऊन ठेपलेला आहे. रशियाने युक्रेनवर चारही बाजूने हल्ले केले. त्यात ७४ लष्करी तळ उध्वस्त झाले असून ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले आहे. रशियाने युक्रेनवर केलेला हा हल्ला अतिशय निंदनीय असल्याकारणाने आसपासच्या देशांनी युक्रेनला मदत करायचे ठरवले आहे.
युक्रेनमधील नागरिकांची परिस्थिती पाहून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक व तसेच विद्यार्थी हे अडकून पडलेले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्याबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. याविषयी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
मंडळी युक्रेन आणि रशियामध्ये चालू असलेला वाद हा युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या जीवावर उठला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांनी युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा दिला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की,
” अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार परराष्ट्र मांत्रालय विभागाच्या संपर्कात आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच, अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनीसुद्धा माझ्याशी सम्पर्क साधला आहे. माझे कार्यालय हे निरंतरपणे परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनीसुद्धा सर्व यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी फार मोठ्या संख्येत आहेत. महाराष्ट्राची संख्या मोठी आहे म्हणून राज्यसरकरने केंद्र सरकारसुद्धा विनंती केली आहे.”
अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते. युक्रेन आणि रशियामध्ये पेटलेल हे युद्ध जरी कुठल्याही थराला गेलं, तरी आपण सर्वे सर्वांच्या रक्षणासाठी प्रार्थना करूयात.