मंडळी कश्मीर फाईल्स नावाच्या चित्रपटामुळे संपूर्ण देशामध्ये वादावादीच वातावरण निर्माण झालं आहे. याचच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद.
शरद पवारांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी द्यायची गरज नव्हती असही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आधार घेत भाजपा जनतेमध्ये चुकीचा गैरसमज पसरवत असून संपूर्ण देशात विषारी वातावरण पसरवण्याच काम करत आहे.”
असा आरोप शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर केला आहे. याआधीसुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी या चित्रपटाला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारवर टीका केली होती.
महाराष्ट्रातील विविध संघटना, संस्था आणि विविध प्रकारच्या समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी भाजपवर टीका केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा त्यांना प्रतिउत्तर दिल आहे.
काय म्हणाले फडणवीस ?
मंडळी कश्मीर फाईल्स या चित्रपटाचार आधार घेऊन केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये विषारी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. अस शरद पवार यांनी म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर प्रतिहल्ला करत उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले की,
” अलीकडच्या काळात राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल, काँग्रेस असेल यांच्यामध्ये अल्पसंख्यांक मत मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे त्यातून अशी वक्तव्य येतात.”
अस फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा वाद आता कुठल्या वळणावर जातो यावर सर्वांचं लक्ष लागूंन आहे.