ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

सुषमा अंधारे

मंडळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली. मात्र उध्दव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लाऊन अनेक नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेणे सुरू केले आहे.

 

ज्यामध्ये नुकतंच आंबेडकरी चळवळीतल सर्वात मोठं नाव म्हणजे सुषमा अंधारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश मिळवून शिवसैनिकाच शिवबंधन हाताला बांधलेल आहे.

 

मात्र शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याअगोदर त्यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक राजकीय सभांमधून बोचरी टीका केली होती.

 

इशरत जहाचा एन्काऊंटर आणि नरेंद्र मोदी कनेक्शन

 

आज आपण सुषमा अंधारे यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सुषमा अंधारे हे आंबेडकरी चळवळीतील मोठं नाव आहे. त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामधल्या एका छोट्याशा गावामध्ये झाला.

 

त्यांचं संगोपन हे त्यांच्या आजोबांनी केलं असून त्या आपल्या आजोबांच नाव आपल्या नावापुढे लावतात. त्यांनी आपले शिक्षण एमएबीएडमध्ये पूर्ण केले.

 

त्यांनी काही वर्षे राज्यशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र त्यांचा रस हा आंबेडकरी चळवळींकडे जास्त प्रमाणात होता. त्याचमाध्यमातून महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले.

 

त्यांनी २००९ साली परळी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्याठिकाणी त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.

 

तसेच त्यांनी यशदा प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक म्हणूनसुद्धा काम केले. त्यांनंतर काही कालावधीसाठी त्या आंबेडकरी चळवळीतील ‘दैनिक लोकनायक’ या वृत्तपत्राच्या पुणे आवृतीच्या संपादक राहल्या. 

 

सत्तेतला भस्मासुर ओळखणे गरजेचे – बेधुंदकार गोविंद पोलाड ( प्रवक्ता संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर)

 

राष्ट्रवादीला पाठिंबा आणि शिवसेनेवर जहरी टीका

 

सुषमा अंधारे यांनी २०१८ साली ‘गणराज्य संघ ‘नावाची संघटना स्थापन केली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता.

 

आणि त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करण्याऱ्या त्यांच्या काही सभा चांगल्याच गाजल्या.

 

ज्यामध्ये त्यांनी ठाकरे परिवारावर टीका करत म्हटलं होतं की,

 

” बजाओ पुंगी भगाओ लुंगी कहेनेवालो के पोते आदित्य ठाकरे अब लुंगी डान्स कर रहे है।”

 

अशी बोचरी टीका विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे परिवारावर केली होती. मात्र आता शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे.

 

प्रवेश घेताच त्यांना उपनेतेपदाची जबाबदारीसुद्धा दिल्या गेली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे आता काय भूमिका घेतील? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *