रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड

विकास

महाराष्ट्रतल्या संपूर्ण मतदारसंघातील माझ्या शेतकरी कष्टकरी कामगार बापाच्या मुलांना विनंती आहे. आपल्या समाजातील विकास हा शेती शिक्षण रोजगार या तीन मूलभूत घटकांवर आधारलेला आहे.

 

पण गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या राजकीय पक्षांनी नागरिकांना रस्ते शोषखड्डे, बसस्टॉप, मंदिर- मस्जिद बांधण्याचा विकास दाखवून मूर्ख बनवलं आहे. एखाद्या रुग्णाला अचानक कुठला आजार आढळला तर जवळपास कुठले मुबलक हॉस्पिटल नसल्याने सरळ मोठ्या शहरात न्यावे लागते.

 

पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

 

यामध्ये कित्येक रुग्णांनी अर्ध्या रस्त्यातच जीव सोडल्याचा घटना आपण बघितल्या आहे. शिक्षण घेण्यासाठी शेतकरी मायबापाला आपली मुलं डिग्रीच्या शिक्षणासाठी बाहेर पाठवावी लागतात आणि भरमसाठ पैसा खर्च करावा लागतो.

 

शिक्षण पूर्ण झालं की रोजगार नाही. मग पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये आपलं कुटुंब सोडून इथली मूल जातात. नाहीच तर मनाला शांती मिळायसाठी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा बहाना आहेच.

 

नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

 

याहीव्यतिरिक्त आसपासच्या शहरात कम्प्युटर ऑपरेटरची 6 हजार पगाराची जॉब आहेच. शाळा आणि कॉलेजमध्ये प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करणारी मुलं 6 हजाराची जॉब करतात हे न पटण्यासारखे आहे.

 

कुठल्याही पक्षाला किंवा संघटनेला विरोध नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कट्टर असाल, कार्यकर्ते असाल. मात्र जाती- धर्माच्या नावावर किंवा साहेबांनी रस्ते बांधून विकास केला अशा भ्रमात राहू नका.

 

भगतसिंगाने ब्रिटिश प्रशासनाविरोधात जसा इंकलाब केला होता. तोच इंकलाब इथल्या प्रत्येक तरुणाकडून झाला तर भविष्य प्रकाशमय आहे. अन्यथा गुलामी स्वीकारावी लागेल. 

        जय हिंद इंकलाब🇮🇳

– बेधुंदकार गोविंद पोलाड
     सामान्य नागरिक

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

1 thought on “रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड”

  1. Pingback: शंभु बंध्यो बजरंग......!! - Political Wazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *