मुख्यमंत्री उध्दव ठाकरेजी शरद पवरांसमोर झुकू नका- भाजप आमदार

nawab malik
                 मंडळी नवाब मलिकांना झालेल्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच चिघळत चाललं आहे. नवाब मालिकांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये जागोजागी आंदोलने करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने मात्र नवाब मलिक यांनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप करत त्यांच्या कठोर शिक्षेसाठी आंदोलने केली.
 
 
या संदर्भात आता भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच थेट निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून नवाब मलिकांना सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे. 
 

काय म्हणाले भाजप आमदार

 
            मंडळी नवाब मलिक यांच्या अटकेसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
ते म्हणाले की,
 
“केंद्रीय तपासयंत्रणांना दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सहकार्य करावं. देव देश आणि धर्मसाठी हे बोलायचे नाही, आता करण्याची वेळ आली आहे. उद्धवजी, दाऊद आणि त्याच्या हस्तकांविरोधात तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या. शरद पवारांसमोर झुकू नका. नवाब मलिकांची हकालपट्टी करा.अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अशी भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे. दरम्यान राज्यसरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी या प्रकरणाचा कसा संबंध आहे यासंदर्भातल्या चौकशीला राज्यसरकार थांबवू का पाहत आहे? हे मर्दांच सरकार आहे. अस म्हणणारे आता बोटचेपी भूमिका का घेत आहे हा आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे.”
 
 
अस भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मात्र यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *