मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलय. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते आंदोलनं करून नवाब मालिकांचा विरोध करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत.
नवाब मलिक यांना बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ला सक्त वसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली.न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतरच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईविरोधात आंदोलने करत आहेत.
राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजप नेत्यांकडून केली जात आहे. मात्र ही मागणी करतांना नागपूरच्या आमदाराची जीभ घसरलीय. भाजपा आमदारांनी मलिकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत कडाडून टीका केली आहे.
भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान
नवाब मलिक अटकेप्रकरणात भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त टीका केली आहे. खोपडे यांनी लकडगंज पोलीस स्थानकामध्ये मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली.
गुन्हा दाखल करून बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत असतांना खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला आहे.
ते म्हणाले की,
” या दोन वर्षात खूप भ्रष्टाचार झालाय. महाविकास आघाडीचे अनेक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. या राज्याच्या जनतेने इतका नालायक आणि बेशरम मुख्यमंत्री पाहिला नाही की जो मंत्री तुरुंगामध्ये असूनसुद्धा त्याचा राजीनामा घेत नाही.”