टीका करणाऱ्यांना वाईन चढली आहे- शिवसेना

             मंडळी जेवढा गदारोळ हल्ली महाराष्ट्रातील राजकारणात होत आहे , तो इतर राज्यांच्या तुलनेत फार मोठा आहे. राज्यसरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर विरोधीपक्ष राज्यसरकारवर चांगलीच टीका करताना दिसून येत आहे. मात्र राज्यसरकारने सांगितलं की \”हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.\”

             या राज्यसरकारच्या निर्णयाचा विरोध करत भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर टीका करत म्हटलं की , \” महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहे.\” त्याचप्रमाणे आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा राज्यसरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. राज्यसरकार आतापर्यंत या प्रकरणावर शांत होती. मात्र राज्यसरकारमधील काही नेत्यांनी विरोधीपक्षामार्फत होणाऱ्या टिकांवर आता मौन सोडलं आहे. 

विरोधी पक्षाला वाईन चढली आहे- सामना

        राज्यसरकरने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताचा आहे. अस राज्यसरकरच म्हणणं आहे. यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारचा चांगलाच कडाडून विरोध करत त्यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील अशा अनेक नेत्यांनी राज्यसरकरच्या या निर्णयाचा विरोध करत टीका केली. 

         मात्र यावर शिवसेनेने संजय राऊत यांच्यानंतर आपलं मौन सोडलं आहे. शिवसेनेने सामनामध्ये लिहिलं की, \”वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. तरीही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे व ते राज्यसरकार विरोधात बोंब मारत फिरत आहेत. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीची मुभा दिल्याने राज्यातील भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे\”. अस सामना या अग्रलेखात शिवसेनेने लिहिलं आहे. आता यावर भारतीय जनता पक्ष काय प्रतिउत्तर देतो यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *