मंडळी महाराष्ट्रातील राजकारणात सद्धया सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणेमध्ये घेतलेल्या सभेत केलेल्या धार्मिक वक्तव्यांवरून सम्पूर्ण महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी आता सर्वसाधारण कुटुंबातील युवकांची धर्माच्या नावाखाली माथी भडकवण्याला सुरवात केली आहे. अस मत समतावादी सामाजिक संघटनांनी वर्तवल आहे.
त्यांनी आपल्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मस्जिदींसमोर भोंगा लावून त्यामध्ये हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्याकारणाने समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणं साहजिकच आहे.
अलीकडे मनसेचे नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी नाशिकमध्ये मस्जिदींवरील भोंगे न उतरवल्यास प्रत्येक मस्जिदीपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अस विधान केल होत. मात्र महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा राज ठाकरेंचा हा मनसुबा हाणून पाडण्याच मत आता भीम आर्मी या संघटनेने व्यक्त केलं आहे.
भीम आर्मीचा राज ठाकरेंना दम
गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात कार्यरत असलेले राज ठाकरे यांना फारस राजकीय यश प्राप्त न झाल्याकारणाने त्यांनी आता धार्मिक राजकारणाचा सहारा घेतलेला दिसतोय. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने राज ठाकरेंना चांगलाच दम दिला आहे.
” राज ठाकरे यांच्या भाषणावर रमजानपर्यंत प्रशासनाने बंदी आणावी. ते आपल्या भाषणांमधून महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याच्या हेतूने राजकारण करत आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्रातूनच नाही, तर सम्पूर्ण भारतीय देशातून तडीपार करण्यात याव.”
अस रोखठोक मत भीम आर्मीने पोलीस महासंचालक आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून व्यक्त केलं आहे. मात्र आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.