समाज आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहाचायच आणि प्रत्येकाच्या वाट्याला फुल ना फुलाची पाकळी देत निरंतर प्रवास करणार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी साध्य केल
हा महाराष्ट्र आहे इथ अनेक पक्ष सत्तेवर आले तर अनेक पक्ष हे सत्तेपायी मातीमोल झाले प्रखर विरोध असतांनासुद्धा युती घडवून आणली आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केली.
हा एवढा खेळखंडोबा फक्त सत्तेपोटी नव्हता तर तो महाराष्ट्रातील समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकासाठी होता हे आज आपल्याला पाहायला मिळत.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला बहुचर्चित आणि ओळखीचं असणार अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला पुन्हा या युतीच्या माध्यमातून पाहायला मिळालं हल्लीच या वर्षीच्या अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारणे सादर केला
यात कमतरता तर नाहीच नाही पण विरोधकांना चुका काढणं आणि त्यावर निषेध करण सुद्धा अवघड झालय. या अर्थसंकल्पात शिंदे सरकार म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिलंय
खास करून मागील २-३ वर्षांपासुन संतप्त शेतकरी वर्गावर भर दिलेला दिसून येत नवनवीन योजना आणि शेतकर्यांच्या पिकाला संरक्षण देण्यात या सरकारने कमी भासू दिली नाही
फक्त १ रु. भरून आपल्या पिकांचा पीकविमा भरण्याची योजना ही या सरकारने शेतकऱ्याला देऊन जिवनदान दिल्यासारखं आहे सध्याच बदलत हवामान आणि अवकाळी पडणारा पाऊस हा शेतकऱ्याच्या जीवावर उठला होता
पण आता या योजनेअंतर्गत शेतकरी बिनधास्त होईल आणि खास म्हणजे ही योजना आता उन्हाळी पीकांसाठी सुद्धा लागू होईल म्हणजे आता समाजातील शेतकरी या घटकाला भरभक्कम होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
या युती सरकारने फक्त शेतकरीच नव्हे तर इतर घटकासाठी सुद्धा योजना आणल्यात जसं की असंघटीत कामगार आणि टॅक्सी-रिक्षा चालक यांसाठी एक स्वतंत्र महामंडळाची स्थापना सुद्धा या सरकारने करण्याचीही घोषणा केली.
कित्येक दिवसापासून चालत आलेला प्रश्न म्हणजे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न सोडवण्यात सुद्धा हे सरकार अग्रेसर असल्याच दिसून येत.
समाजातील काही घटकांचं अर्थिंक उत्पन्न हे कमी असल्या कारणास्तव शिक्षणापासून त्यांची पाल्ये वंचित राहता कामा नये यासाठी ८ वी पर्यंत मोफत शालेय गणवेश वाटपाची सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पात केलेली दिसून येते,
धनगर समाजास १००० कोटी तर १०,००० कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचं काम या सरकारने करून दाखवलं तसेच भाजपा सरकारणे चालू केलेल्या सरकारी योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्याला ६००० रुपयांच मानधन मिळत होत
पण या अर्थसंकल्पामार्फत राज्य सरकारने अजून ६००० रुपये वार्षिक मानधन शेतकऱ्याला देऊ केल आता एकूण १२,००० रुपयांच वार्षिक मानधन शेतकऱ्याला मिळेल
तर आतापर्यंत वयोवृद्ध नागरिकांना मोफत प्रवासानंतर आता महाराष्ट्र राज्यातील महिला एस.टी. प्रवाश्यांना आता तिकिटामध्ये ५०℅ सुट देण्यात येईल .
वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि अन्न-धान्यांना कमी मिळणारा भाव लक्षात घेता तत्पर सरकारणे कांदाउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रती क्विंटल कांद्यामागे ३०० रुपयांच अनुदान जाहीर केल .
कोण म्हणत हे सरकार खोके सरकार आहे ?
असा प्रश्न या राज्य सरकारण लोकांना पाडला आहे तर याऊलट मुख्यमंत्रीपदी विराजमान असणारे एकनाथ शिंदे हे विरोधकांना निशाणा करत
तुम्ही तर फक्त गाजर दाखवले आम्ही जनतेला गाजराचा हलवा दिल्याचं
स्पष्टीकरण देतात ….
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता
तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir