मंडळी मराठा आरक्षणाचा वाद महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलेला असतो. सरकार बदललं तरी मराठा आरक्षणाची परिस्थिती तीच असते आणि जो विरोधीपक्ष असतो तो फक्त आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी विरोध करायचा म्हणजे करायचा या उद्देशाने आपली भूमिका नेहमी मांडत असतो.
जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच सरकार होत, तेव्हासुद्धा मराठा आरक्षणाचा वाद हा चालूच होता आणि आता महाविकास आघाडीच सरकार आहे, तरी मराठा आरक्षणाचा वाद चालूच आहे. फक्त भूमिका घेणारे आणि विरोध करणारे बदलत असतात.
आता हीच विरोधीपक्षाची भूमिका घेऊन सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची माल जपली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना फडणवीसांची महती गायतांना सदाभाऊ खोत म्हणाले की,
” देवेंद्र फडणवीस हे बहुनजनांचे खरे नेते आहेत. कारण ते बहुजनांसाठी नेहमी आवाज उठवत आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी आपली भूमिका ताकदीने मांडली आहे.”
अस सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
शरद पवार जातीयवादी नेते – सदाभाऊ खोत
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की,
” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी समाजामध्ये जातीयवाद पसरवण्याच काम केलं आहे. मात्र त्या सर्वांना पुरून उरलेला माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस. शरद पवार हे जातीयवादी नेते आहेत. म्हणून त्यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल नाही. एकेकाळी मराठा समजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केल्या गेली. अनेक सुनावण्या केल्या गेल्या. मोर्चे काढले गेले. रॅल्या काढल्या गेल्या. मात्र आता तेच लोक सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणापणापासून आपली पाठ फिरवत आहे. कारण त्यांना विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायच नाही. “
असा टोला सदाभाऊ खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना शरद पवार यांच्यावर लगावला आहे.