५६ इंचीची छाती सांगणारे,भारताला भ्रष्टाचारमुक्त करणार होते आणि भारताला महासत्ता बनवून आर्थिक दृष्ट्या अजून मजबूत करून रुपया वधारनार होता….
नेमकं बोलले काय आणि होत काय ?
धर्माच्या नावावर सहानुभूती तयार करून निवडणूकीपर्यंत त्यांना वातानुकूलीत वातावरणात निवडणूका जिंकायच्या .
सध्याच्या भारताची स्थिती अशी आहे कि देवेंद्र फडणवीस यांच्या मते नोकऱ्या आहेत पण भारतीय युवकांमध्ये कौशल्य नसल्याचा ते दावा करतात नेमक यांच्या पक्षाचं धोरण काय ?
हा प्रश्न आता जनतेला पडत असावा भारताला विकासाकडे नेण्याच्या गप्पा करणारे भारताला विकायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत हेच का भाजपच विकास घडवणार सूत्र ?
एकीकडे भारताला मेक इन इंडिया म्हणत उद्योग उभारायला सांगायच आणि सामान्य नागरिक हा कसा आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होईल अशी अपेक्षा दाखवून दरवेळी आर्थिक संकल्पात याच सामान्य नागरिक सोपवन्यात यश कस येईल यावर जोर द्यायचा.
बहुचर्चित उद्योगपती अदानी यांचं एवढं काही गैरव्यवहार बाहेर येत असताना कधीकाळी अदानींसारख्या लोकांना भारत सरकारचा नेहमी पाठिंबा दर्शवनारे पंतप्रधानपदि विराजमान असलेले नरेंद्र मोदी काही बोलत का नसावे ?
तेच दुसऱ्या बाजूला त्यांच्या अर्थमंत्री कसलाही खुलासा न करता फक्त जनतेला समधानकारक असं वक्त्व्य करत भारताची कसल्याच प्रकारे आर्थिक हानी झालेली नाही असं स्पष्ट करतात या पक्षाची सगळी भूमिका पाहता असं नाही का वाटत पाणी इथेच कुठंतरी मुरतंय असं ?
सामान्य नागरिकाच हित जपत स्वस्त साधन उप्लब्धिच भाषण देणारे कदचित विसरले असावं का कि इथं महागाई हि काँग्रेस काळापेक्षाहि वाढली ते ?
आणि जर खरंच हा पक्ष जर भ्रष्टाचारमुक्त आहे तर कोविड काळात संपूर्ण जनतेने दान केलेल्या PM CARE FUND च्या नावाखाली गोळा केलेल्या करोडों अब्जो रुपयांचा हिशेब का मिळत नसावा ?
आणि जर हा निधी सरकारी नसून खासगी आहे तर याची जाहिरात या पक्षाचे लोक सरकारी यंत्रणांमार्फत का करत असावेत ?
जगाला विकासचे स्वप्न दाखवणं आणि दुसरीकडे निर्भीड भाषण देत निडर पत्रकारिता आपल्या देशात असावी असं आव्हान करत पत्रकारितेचिच दमछाक करण कितपत योग्य आहे ?
BBC माहितीपट बंद करून हा पक्ष त्यांची काही प्रकरणें लपवू इच्छितो का ?
आणि जर हे पत्रकारि क्षेत्रांचा गैरवापर करत नाहीत तर का मग जगाला एकतेचा संदेश देणारी भारत जोडो यात्रा सुरु असताना पण त्यांना कव्हरेज देण्यात येत नव्हतं ?
का सारखे-सारखे भारत जोडो यात्रेत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले ?
हुकूमशाह चालवू पाहनारा हा पक्ष किती दिवस टिकेल हे पाहणंसुध्दा मजेशीर राहणार हे मात्र नक्की पण या पक्षाचा सत्ता-उतार होइपर्यंत भारत देश हा नुकसानाच्या बाबतीत ४-५ वर्षे मागे जाऊ नाही म्हणजे झालं !
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता
- माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर
- विनायकराव पाटिल
- ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?
- देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?
तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir