सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?

पेन्शन

अहो कसलं मिशन आणि कोणती जुनी पेंशन …..?


नसेल जमत तर द्या ना सोडून नोकऱ्या…


इथ उच्चशिक्षित आणि पात्र ,पदव्युत्तर युवक आहेत भरपूर काय गरज आहे जुन्या पेंशन ची ?


२००४ साली विशेष निरीक्षणा अंतर्गतच ही योजना रद्द करण्यात आली मग उगाच जुने पुराणे मुद्दे काढून कशाला ढवळाढवळ करायची .अहो महाराष्ट्र राज्यात असे कितीतरी उमेदवार आहे जे की नोकरी करू इच्छितात

 

 

आणि खास म्हणजे ते इच्छुक बऱ्यापैकी युवक आहेत. मान्य आहे की काही राज्यामध्ये जुनी पेंशन योजना लागू केलेली आहे पण खर पाहता महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी जुन्या पेंशन वर जगतो का या गोष्टींची पण शहानिशा राज्यसरकारणे करायला हवी

 

 

कोणताही माणूस हा सरकारी काम म्हणलं की डोक्यात विचार आणतो तो आपलं काम कस लवकर होईल याचा, मग तुम्हाला तर माहीतच आहे एखाद सरकारी काम लवकर झाल तर ते लवकर कस होत अथवा त्याला काय कारण असतात ते .

 

 

न्यायालयाच्या चौकटीत शिंदे-भाजप सरकार टिकेल ?

 

 


१८ लाख लोक संपावर जाऊन सरकारला जे काही जुन्या पेंशन बाबत सक्ती लादण्याचा प्रयत्न करत आहेत तो कदाचित योग्य ही असावा पण महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या आणि ऑटोमेशन च्या नावाखाली कमी होणारा रोजगार याचा इथल्या कुटुंबावर फरक पडतोय त्याच काय ?

 

 

जर कुटुंबातील एखादा कर्मचारी सरकारी नोकरीला असेल तर तो त्याच्या नोकरीच्या काळात अनेक सरकारी योजणांचा लाभ सरकारी सेवक म्हणून घेत असतो पण

 

 

जर त्याला नोकरीनंतरसुद्धा सरकारने त्याचा सांभाळ करावा अशी मानसिकता जर इथला सामान्य माणूस बाळगत असेल तर ते चुकीचं ठरेलं या धोरणाचा अवलंब केला तर विकास सोडा पण महाराष्ट्राला कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही.

 

 

देवेंद्र आणि एकनाथाच ध्येयवेडं “डबल-इंजिन” सरकार !

 

 

हल्लीच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते आपल्याकडे रोजगार आहे पण इथल्या युवकांमध्ये कौशल्ये नाहीत . पण अजून पण कळलं नाही की त्यांना माहित असलेले रोजगार कोणत्या क्षेत्रातील आहेत आणि किती आहेत ते ?

 

 

जर खरंच त्यांच्या बोलण्यात तथ्यता होती तर युवकांमध्ये कौशल्ये प्रस्थापित करणारी मोहीम पण तर ते चालू करू शकले असते …

 

 

असो विषय भरकटंतोय अस आपल्याला वाटतही असेल पण सांगायचा उद्देश हाच की एकाबाजुला इथल्या लोकांना रोजगार प्राप्ती नाहि तर तेच स्वतःच आयुष्य संरक्षित असताना सुद्धा नोकरीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी १८ लाख लोक एकत्र येऊन बंद पुकारताय

 

 

तर यावर सरकारला योग्य ती कार्यवाही करायला हवी .असो यावर सरकारचा निर्णय होईल तो होईल पण मध्यंतरी या मुद्द्यावर जनतेकडून आपआपली मत मांडण्यात येतात बहुतांश लोक हे सरकारी सेवक लाच घेतात

 

 

 

या मुद्द्यावर जोर देत जुनी पेंशन ला विरोध करताय पण जर एका दुसऱ्या बाजूने बघायचं झाल तर अस दिसत की शासकीय आणि अशासकीय सेवक वर्गात विरोधाचा वाद पेटवला जातोय हे थांबायला हव कारण हा महाराष्ट्र आहे

 

 

आणि इथला प्रत्येक माणूस त्याच्या हक्कासाठी सांविधानिक लढा देऊ शकतो म्हणजेच हा लेख फक्त आणि फक्त माझ्या दृष्टीकोनातुन लिहिण्यात आलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात नक्कीच नवीन रोजगार निर्मिती करत सरकार जुनी पेंशन संदर्भात जनतेला साजेल असा निर्णय घेईल अशी अपेक्षा ठेवता येईल

 

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

 

तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir

1 thought on “सर्वकाही असून तुम्हाला पेन्शन, बाकी शेतकरी, बेरोजगार लोकांनी फक्त मरावं का?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *