शिवसैनिक कधी फुटतो का ?

शिवसैनिक

हिंदुहृदयसम्राट यांच्या विचाराची नाळ धरून सार्वभौमत्वाचा अवलंब करून हिंदुत्वाच्या कट्टरतेवर एकाच विचारसरणीचे लोक सोबत घेऊन बाळासाहेबांनी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली

 

 

आणि सहकारी आणि सामाजिक विकासकामे यांच्या जोरावर लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देत सुरुवात केलेला हा शिवसेना पक्ष कधी काळी या पक्षाला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं

 

 

पण स्वबळावर बाळासाहेबांनी याची अल्पावधीत ओळख निर्माण करून राजकीय क्षेत्राला एक नवा पक्ष देऊन राजकारणात क्रांती घडवली .

 

 

ठाकरे परिवारावर बोचरी टीका ते शिवसेनेत प्रवेश. सुषमा अंधारे कोण आहेत?

 

 

फुटीरतावादि लोकांना त्याग करून एकनिष्ठ लोक या पक्षास नेहमी महत्वाचे राहिले बाळासाहेबांनी दिलेला शब्द हा शिवसैनिकांसाठि नेहमी अंतिम राहायचा.

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात आमुलाग्र बदल घडवून आणून बाळासाहेबांनंतर ती शिवसेनेची गादी हि उद्धव ठाकरे यांना सोपवन्यात आली एकनिष्ठ मंडळी हि साथीलाच होती

 

 

महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक कधी व कशी झाली?

 

 

पण काळानुसार काही मतभेद हे वाढतच गेले परिणामि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केली या कारणास्तव् शिंदे गट आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले

 

 

आणि भाजप सोबत युती करून महराष्ट्रात सत्तापालट केली एकीकडे भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र आले असता भाजप पुन्हा सत्तेत येणं हि त्यांच्यासाठि खूप हनिकारक गोष्ट होती आणि ती गोष्ट या घटनेने सत्यात आली.

 

 

एकीकडे भाजप पक्षातील लोक म्हणतात महविकास आघाडीमुळे शिवसेना संपली तर शिंदेगटसुद्धा या युतिने खुश बघायला मिळतोय.

 

 

यातूनच नवीन वाद पेटला शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची आणि न्यायालयानेही शिवसेना एकनाथ शिंदे यांची म्हणत त्यांना धनुश्यबाण देऊ केलं पण यात उद्धव ठाकरे यांच्याप्रति लोकांची सहानुभूती पाहायला मिळाली

 

 

आता बघायचं ते हि युती किती काळ टिकते आणि उद्धव ठाकरे पुन्हा पक्षबांधणी कशी करतात नक्कीच हि राजकीय खेळी भविष्यात लोकांना एकनिष्ठतेची जाणीव करून देणारी असेल .

 

 

पण मनात विचार येतो तो कि,

 

बाळासाहेब असते तर हे प्रकरण कसं पाहायला मिळालं असत म्हणजे नेमक यात परिस्थिती काय राहिली असती ?

 

शिंदे आणि त्यांचें सहकारी हे बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध का गेले ?

 

जर खरच शिवसैनिक आहात तर मग बोलून अंतर्गत वाद मिटवून शिवसेना आणखी बलाढय़ करू शकला नसतात का ?

 

आज जर बाळासाहेब् असते तरी शिंदे गटाने हेच केलं असत का ?

 

आणि खास म्हणजे भविष्यात आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळा गट म्हणून पाहायला मिळेल का भाजप चा अंतर्गत समूह म्हणून दिसेल ?

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता

 

तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *