मंडळी महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात गदारोळ चाललाय. एकीकडे सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी मोफत घर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून संपूर्ण महाराष्ट्रातून सरकारची टीका होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादण्यात व्यस्त झालं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. विरोधी पक्षीय नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकणारी ‘ ईडी ‘ आहे की तुमचा घरगडी, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये केला.
सक्तवसुली संचालनायलाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बोलत होते. मुखमंत्र्यांनी वाटल्यास मला तुरुंगात टाका पण १९९२ च्या दंगलीच्या वेळी मुंबईला वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका, असे आवाहनही भाजपला दिले आहे.
मंडळी ईडीची छाप फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मालमत्तेवरच पडत असते का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण जनतेचे प्रश्न सोडून केंद्र सरकार हे भारतीय देशातील तमाम जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. या देशामध्ये अनेक प्रश्न केंद्र सरकारला सोडवण्यासाठी आहे. मात्र त्या सर्व बाबींवर त्यांचं केव्हाच लक्ष जात नाही.
एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एल.पी.जी. सिलेंडरचे भाव वाढवून केंद्र सरकार निवांत बसल आहे. तर दुसरीकडे अशा मुद्द्यांवर भारतातील जनतेच लक्ष जाऊ नये. यासाठी ते हिंदू मुस्लिम, ईडी लावणे या सर्व गोष्टी करत असत. म्हणून भारतीय देशातील प्रत्येक व्यक्तीन आता सतर्क रहायची वेळ आली आहे