मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेत धार्मिक राजकारणाचा डावपेच आखून आपल्या भाषणामधून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती.
त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांचा मुद्दा पुन्हा उकरून जनतेच्या सामाजिक प्रश्नांना तळा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडला टार्गेटवर धरलं होत. मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडचे जेष्ठ नेते मनोज आखरे यांनी राज ठाकरेंना सोशल मिडियाद्वारे चर्चेसाठी ओपन चॅलेंज केलं होतं.
मात्र राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या आव्हानापासून नजर चोरली होती. त्यामुळे त्यांना संपूर्ण सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात आलं होतं. राज ठाकरे हे आपल्या भाषणाच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अस मत बऱ्याच नेत्यांनी व्यक्त केलं होतं. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांच्या केलेल्या उल्लेखावरून जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तरात म्हटलं की,
“पुरंदरेला आणि जेम्स लेनला उकरून तुम्ही बाहेर काढलं आहे. त्यांची हाड मोजायला लावू नका. मला इतिहासाबद्दल बोलायचं नाही. मी जर शिवचरित्रातल पान अन पान वाचून दाखवलं ना, तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितल ते सत्य होईल. त्यांनी काय सांगितल ते ही मी सांगत नाही.”
अस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
पुरंदरेंनी प्रशासनाला माफीपत्र लिहिलं होतं- जितेंद्र आव्हाड
राज ठाकरे यांनी पुरंदरे आणि जेम्स लेनच्या उकरून काढलेल्या वादाला जोरदार प्रतिउत्तर जीतेंद्र आव्हाड यांनी काल इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये दिल. ते बोलताना पुढे म्हणाले की,
” माझ्याकडे पुरावा आहे. जेव्हा पुरंदरे यांनी कालनिर्णय या कॅलेंडरमध्ये स्वतःच्या मनाने छत्रपती शिवरायांची जन्मतारीख हे तिथीप्रमाणे मांडली होती. नंतर ते पंढरपुरला एका कार्यक्रमात गेले असतांना अमरजीत पाटील या शिवमावळ्याने पुरंदरेला जाब विचारल्यानंतर त्याने माफीपत्र प्रशासनाला लिहिलं होतं.”
अस बोलतांना त्यांनी राज ठाकरे यांना पुराव्यानिशी चांगलच धारेवर धरलं. मात्र आता यावर राज ठाकरे आव्हाडांना काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.