अमरावती पदवीधर निवडणुकीत चर्चेच नाव ठरत असलेल्या वंचितच्या डॉ. अमलकरांचा संघर्षमय जिवनप्रवास

डॉ. अमलकारांचा

मंडळी राजकीय क्षेत्रात काही राजकीय नेते आपल्या घराण्याच्या राजकीय वारस्यांपोटी मुखात सोन्याचा चमचा घेऊन येत असल्या कारणाने त्यांचं राजकीय पद हे निश्चितच असत. तर काही राजकीय नेते हे अगदी समाजाच्या तळागाळापासून संघर्ष करून आपलं नेतृत्व स्थापन करत असतात.

 

सर्वसामान्य लोकांमधून आणि सामाजिक जान असलेल्या कुटुंबातून असच एक पुढे आलेलं आणि आपल्या अनोख्या नेतृत्वक्षमतेमुळे विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणी काँग्रेसच्या राजकीय नेत्यांच्या खुर्च्या हलवणारं नेतृत्व म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ. अनिल अमलकार.

 

मंडळी डॉ. अमलकारांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे. डॉ. अनिल अंमलकार यांचा जन्म १५ डिसेम्बर १९७० साली बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी झाला. आईवडिलांपासूनच त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वसामान्य लोकांना मदत करायची जणू परंपराच होती. जनतेची तळमळ जाणून घेणारा आपल्या पालकांचा हाच गुण डॉ. अमलकारांमध्ये आला असावा.

 

डॉ. अमलकारांचा शैक्षणिक संघर्ष

 

मंडळी लहानपणापासूनच डॉ. अमलकारांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि शालेय शिक्षणाची जिद्द होती. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. उच्च माध्यमिक शिक्षण हे नांदुरा येथील ज्युनियर कॉलजेमध्ये झाले.

 

नंतर त्यांनी शेगाव येथील माऊली संत गजाजन महाराज अभियांत्रिकी कॉलेजमधून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये विशेष बाब अशी की आपलं अभियांत्रिकीच शिक्षण चालू असताना डॉ. अंमलकारांनी विद्यार्थांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचं काम केलं.

 

म्हणूनच आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या कारकिर्दीमधून इथल्या सर्वसामान्य लोकांना डॉ. अमलकारांमध्ये एक निर्भीड नेतृत्व दिसायला लागलं होत. आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी कॉलेजमधून एम. इ. पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवीसुद्धा मिळवली आहे. प्रा. डॉ. अमलकरांनी डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर तब्बल २५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात मुंबई, नागपूर आणि शेगाव येथील माऊली संत गजानन महाराज अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शैक्षणिक सेवा दिली आहे.

 

शिक्षण क्षेत्रातील डॉ. अनिल अमलकरांचा संघर्ष पाहता अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांचा कल डॉ. अमलकारांकडे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

 

©copyright politicalwazir.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *