शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील ०४ जागे साठी निवडणूका होणार! उमेदवारी देताना पक्षांमध्ये एकमत नाही.
नुकत्याच महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूका पार पडल्या आहेत त्यामुळे आत्ता सगळ्यांचे लक्ष ०४ जुन ला जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकला कडे आहे, अशातच केंद्रीय निवडणुक आयोगाने विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील ०४ जागे साठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदासंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ या चार मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ ०७ जुलैला संपत आहे त्यामुळे त्या जागा भरून कडण्यासाठी निवडणूक आयोगानी या निवडणूका जाहिर केल्या आहेत.
३१ मे पासुन ०७ जुन पर्यंत या जागेसाठी अर्ज भरण्याची मुदत असल्यामुळे महविकास आघाडी आणि महायुती कडून जोरदार तायारी चालू झाली आहे. २६ जुनला या चारही मतदारसंघातील निवडणूका पार पडणार आहेत आणि ०१ जुलै ला निकाल जाहिर होणार आहे. त्याच बरोबर ०४ जुन ला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि २६ जुनला विधानपरिषदेच्या निवडणूका यामुळें उमेदवारी जाहिर करताना पक्षांमध्ये मतभेद होतांना दिसत आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने अनिल परभ यांना उमेदवारी जाहिर केली आहे. परभ उद्धव ठाकरे यांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात २०१२ मध्ये ते पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले २०१८ मध्ये ते पुन्हा आमदारा द्वारे निवडूण येऊन ते आमदार झाले. माहविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आणि अत्ता पुन्हा एकदा त्यांना या मतदारसंघातुन उमदेवरी देण्यात आली आहे.
या उलट महायुती मध्ये मात्र उमेदवारी जाहिर करण्यात संभ्रम दिसतोय हि जागा शिवसेनेची पारंपारिक जागा असल्यामुळें शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर दीपक सावंत यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे परंतू या जागेवर भाजप दावा करत तरुण भारतचे किरण शेलार यांना उमेदवारी देण्याची इच्छा प्रकट केली आहे. परंतू दीपक सावंत हे २००४ पासुन २०१८ पर्यंत विधानपरिषदेत निवडूण आले आहेत २०१४ च्या फडणवीस सरकार मध्ये सावंत यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्यान मंत्री म्हणून काम केलं आहे त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे बोलले जात आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघाचा विचार केला तर इथून शिक्षक भारती संघटनेचे कपिल पाटील आमदार आहेत परंतू या वेळेस ते निवडणूक लढवणार नाहीत २००६ पासून पाटील या जागे वर निवडून येत आहेत त्यांनी शिक्षकांच्या हिता साठी अनेक निर्णय घेतले आहेत. परंतू या वेळेस शिक्षक भारती संघटने कडून सुभाष मोरे निवडणूक लढवणार आहेत. सुभाष मोरे शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी या साठी मोरे यांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भक्कम समजली जात आहे.
ठाकरे गटा कडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. न. अभियंकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवला आहे. याच बरोबर महायुती कडून या मतदारसंघासाठी अजून कोणाचे नाव पुढे आले नाही परंतू कोणाला उमेवारी द्यायची या वर चर्चा चालू असल्याचे समजते.
याच बरोबर या चारही जागामध्ये महत्वाची मानली जाणारी जागा आहे कोकण पदवीधर मतदारसंघातली. कोकण मतदासंघातून भाजपचे निर्जन डावखर विध्येमान आमदार आहेत, २०१२ मध्ये ते राष्ट्रवादी कडून या मतदासंघात निवडू आले होते त्या नंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि २०२८ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून येवून कोकण पदवीधर मतदासंघाचे आमदार झाले. या वेळेस सुद्धा भाजप कडून डावखरच उमेदवार असतील असे बोलले जात होते, परंतू मनसेनी या मतदारसंघातून आपला उमेदवार जाहिर केला आहे.
लोकसभा निवडणूकीत मनसेनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेनी दिलेला उमेदवार महायुतीचा आहे की मनसे स्वातंत्र्य हि निवडणूक लढवणार आहे हे स्पष्ट झाले नाही.
मनसेनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी लेखक, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहिर केली आहे त्यामुळे मनसेच्या विरोधात महायुती आपला उमेदवार उभा करेल का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
या उलट महविकस आघाडी मध्ये पण उमेदवारी जाहिर करताना तेड निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत काँग्रेस कडून या जागेसाठी नाना पटोले यांनी दावा केला होता, परंतू ठाकरे गटाकडून किशोर जैन यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होताना दिसत आहे परंतू ठाकरे गटांनी दोन मतदारसंघात आपले उमेदवार जाहिर केले आहेत त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस मागर घेणार नाही असे बोलले जात आहे.
नाशिक शिक्षक मतदासंघांत ठाकरे गटाचे विद्येमान आमदार किशोर दराडे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यताता आहे. दराडे यांनी शिक्षकांसाठी सभागृहात नेहमीच आवाज उठवला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भक्कम आहे असे बोलले जात आहे. या उलट महायुती कडून अजून उमेदवारी जाहिर झाली नसुन ही जागा शिवसेना शिंदे गट लढविणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानपरिषदच्या निवडणूका होतायत आणि पक्षा मध्ये उमेदवारी देण्याबाबत एकमत दिसतं नसल्या मुळे ह्या निवडणूका चांगल्याच रंगणार आहेत आणि फुटीचे राजकरण होण्याची सुद्धा शक्यता आहे या निवडणूकीत कोणता पक्ष कोणा सोबात राहील आणि कोण विरोधात जाईल हे पाहणे मजेशीर असणार आहे.