निकालाआधीच वंचितच्या डॉ. अनिल अमलकारांचा विजय निश्चित का मानला जातोय ?

डॉ. अनिल अमलकारांचा

मंडळी निवडणुक म्हटली की जय पराजय हा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवल्या जात असतो. मात्र या वर्षी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये निकालाबाबत आश्चर्यचकीत करणारी बाब दिसून येत आहे.

 

होय मंडळी. दिनांक ३० जानेवारी २०२३ ला सोमवार रोजी अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच मतदान होणार आहे. ज्यामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रत्येकाने आपल्या विजयाची दावेदारी स्थापित केली आहे.

 

मात्र महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. रंजित पाटील व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत होती. पण यामध्ये ट्वीस्ट आणलाय तो वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. अनिल अमलकरांनी. 

 

भाजप आणी काँग्रेससाठी वंचितचे प्रा. डॉ. अनिल अमलकार सर्वात मोठी डोकेदुखी 

 

मंडळी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार.

 

त्याच कारण अस की, गेल्या १० वर्षांपासून अमरावती पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे डॉ. रंजित पाटील हे आमदार आहेत. मात्र अमरावती मतदार संघातील पदवीधरांच्या अनेक तक्रारी डॉ. रंजित पाटील यांच्याविरोधात आहे.

 

त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपचा पत्ता आधीच कट झालेला दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसला योग्य उमेदवार मिळत नव्हता. अखेर त्यांनी धीरज लिंगाडे यांना वेळेवर उमेदवारी दिली.

 

यावरून स्पष्ट होते की काँग्रेसनेसुद्धा पदवीधर निवडणुकीची लढाई लढण्याआधीच रामराम ठोकला आहे. याशिवाय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल अमलकारांचा प्रचार आणी प्रसार चांगलाच जोर धरताना दिसून येत आहे.

 

डॉ. अमलकारांचा जनसंपर्क आणि रस्त्यावर उतरून पदवीधरांसाठी काम करण्याची तळमळ हे वंचित बहुजन आघाडीसाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरत आहे.

 

सोशल मीडिया असो की अमरावती पदवीधर मतदार संघातील गाव गल्ली बोळातील जनतेमध्ये डॉ. अमलकारांच्या निश्चित असलेल्या विजयाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

ज्यामुळे अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निधवणुकीतून भाजप आणी काँग्रेसचा आधीच पत्ता कट झाल्याच स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

 

©copyright politicalwazir.in 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *