लोकसभेच्या निवडणुका चांगल्याच रंगल्या आहेत. अशातच हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. अशा बातम्या पुढे येत आहेत.
हरियाणात एक महिना आधिच भाजपा जेजेपी सरकार पाडुन भाजपने अपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. मात्र महिनाभरातच भाजपा सरकार धोक्यात आले आहे. भाजपा सोबत असलेल्या तीन अपक्षांनी भाजपाचा पाठींबा काडुन घेतल्याने सरकार अल्पमतात आले, असे बोलले जात आहे.
शेतकर्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्यांमुळे पाठिंबा काढून घेतल्याचं या नेत्यांनी सांगीतले आहे. याचा फायदा घेत भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
सोमवीर सांगवान, रणधीर गोलन, धरमपाल गोंदर यांनी रोहतक येथे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेवून पाठिंबा काढून घेतल्याची माहिती दिली. आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रसचे समर्थन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. बहुमत मिळवण्यासाठी ४६ जागा असणे आवश्यक आहे.
परंतु हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि INLD चे अभय चौटाला लोकसभा लढवत असल्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या एकूण ९० सदस्य संख्या, ८८ झाली आहे आणि बहुमतासाठी ४५ सदस्याची गरज आहे.
परंतु भाजपाकडे सद्या ४३ सदस्य आहेत. यात भाजपाचे ३८ हरियाणा लोकहित पार्टीचा १ आणि ४ अपक्षांचा पाठिंबा आहे. बहुमताचा आकडा ४५ आहे आणि भाजपा कडे ४३ सदस्य आसल्याने बहुमत नसल्याचे स्पष्ट होते.
काँग्रसकडे विधानसभेत ३१ जागा आहेत. तीन अपक्ष आमदारांनी पाठींबा दिला आहे, असे काँग्रसकडे ३४ सदस्य आहेत. म्हणजे दोन्ही मोठ्या पक्षाकडे बहुमत नाही. म्हणुनच काँग्रसने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
परंतु देशभरात लोकसभा निवडणुक चालु असल्याने विधानसभा सत्र बोलावले जावू शकत नाही. त्यामुळे ४ जुन नंतरच विधानसभा सत्र बोलावले जावू शकते.
त्यामुळे ४ जुन पर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु ४ जुन नंतर विरोधी पक्ष भाजपाला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करु शकते. मात्र हरियाणात १३ मार्चला (२०२४) विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला होता.
त्यामुळे पुन्हा ६ महिने विश्वास दर्शक ठराव मांडता येत नाही. म्हणजे भाजपा सरकारला धोका नसल्याचे दिसुन येत आहे. परंतु ६ महिन्या नंतर जेजेपी कोणत्या पक्षाचे समर्थन करेल यावर हरियाणात सत्तेचं गणित जुळेल.