मंडळी भारतीय देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं. पण या स्वातंत्र्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ज्यामध्ये २३ मार्च १९३१ साली शहीद भंगतसिंग यांना झालेली फाशी आठवली तर आजही प्रत्येक भारतीयांच्या भावना गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही.
पण भगतसिंग यांच्या फाशीचा वाद हा बऱ्याच भारतीय जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करून गेला. ज्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल काही लोक आजही प्रश्न उभे करतात.
एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी
मग गांधीजी खरच भतसिंगांना फाशी होण्यापासून वाचवू शकले असते का? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, भगतसिंगांना फाशीच्या शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर त्यांना वाटत होतं की,
“आपल्याला फाशी दिल्यास आपल्या तत्वज्ञाला उजाळा मिळेल आणि लोकांचा जास्त पाठिंबा मिळेल. मला फाशी झाली तर जनतेच्या मनात क्रांतीचा भडका उडेल आणि या देशाला लवकर स्वातंत्र्य मिळेल.”
अस भगतसिंग यांना वाटत होत. दुसरीकडे ब्रिटिश सरकारमध्ये गांधीजींनी सहभाग मिळवण्यासाठी त्यांच्याशी करार केला होता.
आणि बाबासाहेबांच्या त्या अग्रलेखाने ब्रिटिशांचे धाबे दणाणले
ज्यामुळे लोकांना वाटत होतं की गांधीजी भगतसिंगांना फाशी होण्यापासून वाचवू शकेल. त्यानंतर गांधीजींनी ब्रिटिश व्हॉईसरॉयला भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेबाबत पत्र लिहिलं.
गांधींजींच भगतसिंगांबद्दल व्हॉईसरॉयला पत्र
मंडळी भागतसिंगांच्या फाशीबद्दल गांधीजींनी व्हॉईसरॉयला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की,
” मी हे पत्र आपणास शांतता आणि संरक्षणाच्या भूमिकेतून लिहितो आहे. भगतसिंग यांची शिक्षा कमी करता येणार नसल्याचं तुम्ही मनमोकळेपणाने मला सांगितलं. मात्र जर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर देशातील शांततेला धोका आहे. राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या तिघांचे प्राण वाचले तर आम्ही हिंसक कारवाया थांबवू आणि आम्ही ज्या हत्या यापुढे करणार होतो त्याही थांबवण्यात येतील असं आश्वासन क्रांतिकारकांच्या संघटनेने आपणास दिलेलं आहे. राजकीय हत्या यापूर्वीही झाल्या आहेत. हे तीन जीव वाचले तर येणाऱ्या हत्या होणं थांबतील. माझ्या मताचा तुम्ही नेहमीच आदर करता आणि माझं मत नेहमीच शांततेच्या बाजूने असत. त्यामुळे फाशीची अंमलबजावणी करून आपण माझी स्थिती अडचणीची करू नये अशी आपणास विनंती आहे.”
अस गांधीजी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मंडळी उगाच काहीपण तर्क वितर्क लावून लोक काहीपण बरळत असतात. गांधीजींनी भगतसिंग यांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणूनच आज जनतेला कळाले नाही.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- शैक्षणिक वस्तू वर १८ ℅ जीएसटी लावणारा ये नया भारत है !!
- गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती
- १ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास
- RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir