आमदार चरण वाघमारे यांची भाजपमधून हकालपट्टी

आमदार चरण वाघमारे

मंडळी महाराष्ट्रामध्ये एकीकडे विविध पक्षांचे एकमेकांविरोधात वाद, टीका-टिप्पणी चालू असताना दुसरीकडे आंतरिक वाद निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे.

 

याच उत्तम उदाहरण म्हणजे मनसेतील पुण्याचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांचा आपल्याच पक्षामध्ये चालू असलेला वाद आणि आता भंडारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार चरण वाघमारे यांचा आपल्या भारतीय जनता पक्षासोबतचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

 

जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे

 

आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची साथ दिल्यामुळे त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने कारवाई केली आहे. या विषयी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना माहिती दिली.

 

तिरुपतीला मर्जीनुसार गेलो – वसंत मोरे

 

ते म्हणाले की,

 

” चरण वाघमारे आणि ५ सदस्यांनी केलेली कृती हे योग्य नाही. त्यांनी पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन केले आहे. म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भारतीय जनता पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे.”

 

अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *