अजाण आणि हनुमान चालीस्याच्या वादावर फुटेज पण शेतकऱ्याच्या आत्महत्येला कव्हरेज नाही

शेतकऱ्याच्या आत्महत्येला

मंडळी एकीकडे महाराष्ट्रातील राजकारण भोंगा अजाण हनुमान चालीसा या सर्व मुद्द्यांवर चाललेलं असताना एखादा शेतकरी एखाद्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करतो, तरी सोशल मीडिया या घटनेला कव्हरेज देत नाही ही सर्वात दुःखाची गोष्ट आहे.

 

शेतकऱ्याची विशिष्ट कुठली जात किंवा धर्म नाही तर त्याला फुटेज कसा मिळणार?  महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर ईडीची कारवाई करण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे काही नेत्यांना आपल्या भाषणाच्या माध्यमातून लोकांची माथी भडकवून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यामध्येच रुची वाटत आहे.

 

भाजप खासदाराच राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन

 

गरिबांची मूल जातात मग हातामध्ये धर्माचे झेंडे घेऊन एकमेकांच्या धर्माची कत्तल करायला. गुन्हा पण सर्वसाधारण मुलांवरच दाखल होतो. मात्र नेते आपल्या भाषणामधून फुकटच्या बाता करण्यात मग्न असतात.

 

राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र

 

एखादा कवी एखादा लेखक शेतकऱ्यावर कविता करून एखादा पुरस्कार घेऊन मोकळा होतो. मात्र शेतकरी अजूनही मरतोच आहे. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. 

 

बीडमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येपासून राजकीय नेते धडा घेणार काय? 

 

 

काल महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेवजी जाधव नावाच्या शेतकऱ्याने आधी शेतातील ऊस पेटवून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

सध्या महाराष्ट्रभरात हनुमान चालीसा आणि अजाण यावर राजकारण चालू आहे. जे लोक धार्मिक राजकारण करत आहेत. त्यांनी एकदा शेतकऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न विचारून बघावे. तुमचा भोंगा आमच्या कामाचा नाही, तर इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *