या कारणांमुळे हुकल शरद पवार यांचा प्रधानमंत्रीपद

शरद पवार

मंडळी राजकिय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द पुढे नेत असतांना प्रत्येक नेत्याचं हे स्वप्न असत की आपण या देशाचा एक दिवस प्रधानमंत्री झालो पाहिजे.या पदासाठी नेहमी महाराष्ट्राबाहेरील नेतेच पोहचू शकले.

 

मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आणि एक मराठी माणूस म्हणून शरद पवार हे नेहमीच प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत राहले. पण त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने या पदापासून वंचित राहावं लागलं.

 

शरद पवार यांना पहिल्यांदा १९६७ साली काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणूकीमध्ये उतरवलं आणि ते निवडूनही आले. चारवेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले.

 

१९७८ च महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार आपल्याला माहिती आहे काय?

 

शरद पवार यांनी आपल्या राजकीय शैलीने आपले नाव देशपातळीवर चांगलेच गाजवले होते. १९९१ साली झालेल्या राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नव्हतं. सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या.

 

राजीव गांधीनंतर काँग्रेसचा युवा तळफदार नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. मात्र काँग्रेसच अध्यक्षपद तेव्हा जेष्ठ नेते नरसिंह राव यांना देण्यात आलं. त्यानंतर त्यांना प्रधानमंत्रीपदसुद्धा देण्यात आलं.

 

१९९९ ला नारायण राणेंमुळे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री

 

अशाप्रकारे पवार यांची पहिली प्रधानमंत्री व्हायची संधी हुकली. मात्र शरद पवार आणि त्यांच्या गटाने नरसिंह राव यांच्या प्रधानमंत्री पदाला विरोध करत सांगितलं होतं की,

 

” एकाच व्यक्तीकडे पक्षाच अध्यक्षपद आणि देशाच प्रधानमंत्री असणं हे गरजेचं नाही.”

 

मात्र शरद पवार यांना नाईलाजाने नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात सरंक्षण मंत्री राहावं लागलं. १९९६ दुसऱ्यांदा शरद पवार यांना प्रधानमंत्री पदाची संधी होती. काँग्रेसचे १४५ खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते.

 

यावेळी लालू यादव, मुलायम यादव आणि डावे पक्ष शरद पवार यांना पाठींबा देत होते. मात्र याला नरसिंह राव इच्छुक नव्हते. काँग्रेस सरकारन देवे गौडा यांना बाहेरून पाठिंबा देत प्रधानमंत्री पद दिल आणि शरद पवार यांची दुसरी संधी हुकली. 

 

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी आपलं मत व्यक्त करतांना म्हटलं आहे की,

 

” शरद पवारांनी काँग्रेस पक्षात आघाडीच्या फडीतील नेता म्हणून अल्पावधीतच नाव कमावलं. १९९१ आणि १९९६ मध्ये ते प्रधानमंत्री पदाचे नक्कीच दावेदार होते. पण काँग्रेस पक्षातील ‘ दरबार पॉलिटिक्स ‘ मुळे त्यांना प्रधानमंत्री होता आलं नाही. आणि हे देशाचं झालेलं नुकसान आहे”.

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *