देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा

मंडळी महाराष्ट्रातील राजकारण सध्या हे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी उतावीळ झालंय अस म्हणायला काही हरकत नाही. यामध्ये सर्वात आधी नंबर लागतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा.

 

मुंबई आणि ठाणेमध्ये घेण्यात आलेल्या त्यांच्या सभांमध्ये शिक्षण , शेती, रोजगार या मुद्द्यांव्यतिरिक्त हनुमान चालीसा , अजाण, हिंदू- मुस्लिम हेच मुद्दे ऐकायला मिळाले. त्यामुळे समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकांना एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होणे साहजिकच आहे.

 

राज ठाकरे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र त्यांना राजकीय यश अजूनपर्यंत प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी आता धार्मिक राजकारणाचा सहारा घेतलेला आहे. जे लोकांचे मतं घेण्यासाठी सर्वात उपयुक्त साधन आहे.

 

राज ठाकरेंच्या या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय मनसुब्याला आता आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी पाठिंबा दिला आहे. धार्मिक राजकारण खेळून आपण सहज मतं घेऊ शकतो. हे प्रत्येक राजकीय नेत्याला चांगलच माहिती आहे. म्हणून राज ठाकरेंच्या या चालू असलेल्या राजकीय खेळामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनीसुद्धा सहभाग घेतला आहे.

 

आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याची ग्वाही दिल्यानंतर अमरावतीमधील शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या घरापुढे आंदोलन केलं. यावर आता नवनीत राणा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. 

 

काय म्हणाल्या नवनीत राणा ? 

 

शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा यांच्या घरापुढे आंदोलन करतांना पती रवी राणा आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर नवनीत राणा यांनी शिवसेनेला चांगलच प्रतिउत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की,

 

” शिवसैनिकांच माझ्या घरापुढे येऊन आंदोलन करणे ठीक नाही आहे. त्यांनी माझ्याविरोधात मुरदाबादचे नारे लावले. पण धर्म माझ्यासाठी आधी आहे आणि धर्मासाठी जर मला मुरदाबाद म्हटल्या जात असेल, तर मी मुरदाबाद आहे.”

 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,

 

” उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे. बाळासाहेबांचे विचार आता त्यांच्यात राहलेले नाही. बाळासाहेब ठाकरेंनी केव्हाच कुठल्या पदाची लालसा केली नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी पदासाठी त्यांचे विचार सोडले आहेत. राज ठाकरेंमध्येच बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार दिसून येतात. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर राज ठाकरेंची गरज आहे. आम्ही कुठल्यापण परिस्थितीमध्ये मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार. शिवसैनिकांनी जरी पाय तोडण्याची गोष्ट केली असली तरी आम्ही देवाचं नामस्मरण करत येणार.”

 

अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *