गोधरा हत्याकांड आणि गुजरात दंगल- एक न उलगडलेलं कोडं…

गोधरा हत्याकांड

मंडळी भारतीय देशामध्ये आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मा-धर्मांमध्ये दंगे भडकवण्याचं काम राजकीय नेते करत असतात. पण गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर घडलेली गुजरातमधील हिंदू-मुस्लिम दंगल आठवली तर आजही अंगावर शहारे येतात.

 

या प्रकरणाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी झालं असं की, १९९२ ला अयोध्येमध्ये घडून आलेला बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचा वाद हा २००२ मध्येसुध्दा संपलेला नव्हता. हे साल होत २००२.

 

जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री लालू यादव होते. अयोध्येतील बाबरी मस्जिदीच प्रकरण घडून जवळपास १० वर्ष झाली होती. पण तरीही अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेने एक आंदोलन केलं होतं.

 

सोनिया, उध्दव आणि पांडवांची पाच गाव – ज्ञानेश वाकुडकर

 

जे आंदोलन संपल्यानंतर दिनांक २६ फेब्रुवारी २००२ ला विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अयोध्या ते गोधराच्या ट्रेनमध्ये परतीच्या प्रवासाला निघाले होते.

 

त्यानंतर सकाळी जवळपास ३ वाजताच्या सुमारास गोधरा अगोदर येणाऱ्या एका स्टेशनमधला एक चहावाला ट्रेनच्या बोगीमध्ये चहा विकण्याकरीता चढतो. त्याच्यामध्ये आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये वाद होतो.

 

चहावाला बोगीच्या बाहेर पडतो आणि आपल्या मित्र मंडळींना गोधरा स्टेशनवर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी जाब विचारण्याकरिता तयार राहण्यास सांगतो. गोधरा स्टेशन येताच हा वाद टोकाला जातो.

 

आणि ज्या बोगीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत म्हणजेच एच फाईव्ह व एच सिक्स बोगीवर दगडफेक करण्यात येते व त्यानंतर बोगीला आग लावण्यात येते. या प्रकरणात जवळपास ५९ लोकांचा मृत्यू होतो. मात्र या प्रकरणावर नेमलेल्या कमिटींचे वेगवेगळे रिपोर्ट येतात.

 

राष्ट्रगीतामधल्या ‘भारत भाग्य विधाता’ या वाक्याचा वाद आणि राष्ट्रगीताचा इतिहास

 

ज्यामधील एका रिपोर्टमध्ये म्हटल्या जात की हा वाद चहावाला आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. दुसऱ्या रिपोर्टमध्ये म्हटल्या जात की, शॉर्ट सर्क्युट झाल्यामुळे ट्रेनच्या बोगीला आग लागली आणि लोकांचा मृत्यू झाला. तिसऱ्या रिपोर्टमध्ये म्हटल्या जात की, हे प्रिप्लॅन केलेलं प्रकरण होत.

 

अचानक घडलेली गुजरात दंगल

 

मंडळी हे प्रकरण हळूहळू संपूर्ण देशात पसरल्या जात. आणि सोशल मीडियावर याला हिंदू-मुस्लिम वादाच नाव दिल्या जात. आश्चर्याची गोष्ट अशी की मृत असलेल्या ५९ लोकांचे प्रेत हे त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द न करता अहमदाबादला एका ट्रकमध्ये खुल्याने नेण्यात येतात.

 

जेणेकरून हिंदू-मुस्लिम वाद वाढावा आणि दंगल पेटावी. गुजरात जवळपास सलग तीन दिवस हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये पेटत राहत. एकूण बाराशे लोकांचा मृत्यू होतो. १५०० दंगलखोरांवर गुन्हे दाखल होतात. मात्र जसजसे दिवस आणि वर्षे उलटत जातात.

 

एकूण १५०० पैकी फक्त ३१ लोकांना शिक्षा सुनावली जाते व इतर आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन देण्यात येतो.२०११साली ३१ पैकी ११ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात येते व उर्वरीत २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते.

 

मात्र २०१७ ला परत कोर्टाकडून फाशीची शिक्षा झालेल्या ११ आरोपींना फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. म्हणजेच मंडळी गोधरा हत्याकांड आणि गुजरातमधील हिंदू-मुस्लिम दंगल यामध्ये नक्कीच मोठ्या राजकीय नेत्यांच्या हात आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *