महायुतीचा महाराष्ट्रात सत्तेसाठी संघर्ष!
उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रातुन लोकसभेत सर्वात जास्त उमेदवार पाठवले जातात. त्यामुळे लोकसभेत बहुमत पाहिजे असेल तर महाराष्ट्रातुन जास्तित जास्त जागा मिळवणे आवश्यक आहे. या लेखातून ४०० पार ची घोषणा देणार्या भाजपची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे समजुन घेवुयात.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होताना दिसत आहे. पहिल्या दोन टप्यातले मतदान झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तिन जिल्हांचा समावेश होता. या दोन टप्यात मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे असल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे महायुतीच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जास्तित जास्त प्रचार सभा घेताना दिसत आहेत. शिवसेना पक्षाचे विभाजन होवून शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झाले. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असले तरी शिवसेनेची ओळख ठाकरे कुटुंबच आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना लोकांचे भावनीक समर्थन मिळत आहे. आणि त्या जोरावर उध्दव ठाकरे यांची मशाल (ठाकरे गट) एकनाथ शिंदे यांना भारी पडत आहे.
त्यामुळेच पहिल्या दोन टप्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव जास्त दिसला नाही. त्याच बरोबर राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा फुट पडुन अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. शरद पवारांची महाराष्ट्रात असलेली राजकीय प्रतिष्ठा आणि त्यांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी महाष्ट्रात महायुतीला अडचणीत आणलय. उमेदवारी देताना राजकीय खेळी खेळत एकमताने महायुतीला जागा मिळेल, असे वाटत होते, त्या मतदार संघात पण राजकीय संघर्ष पेठलेला दिसतोय.
बीड मतदारसंघ भाजपाचा गड राहिला आहे. सलग ३ वेळा या मतदारसंघात भाजपाची सत्ता होती. परंतु या वेळेस या मतदारसंघात भाजपाला संघर्ष करावा लागत आहे. मराठा आरक्षणामुळे या मतदारसंघात जनतेची भाजपावर नाराजी असल्याचं दिसुन येत आहे.
त्याचबरोबर अहमदनगर मध्ये सुद्धा विखे पाटिल विरुध्द निलेश लंके हि लढत चांगलीच रंगली आहे. विखे पाटिल विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात पवारांनी निलेश लंकेंना उमेदवारी देवुन विखे पाटलांची कोंडी केली आहे.
एवढेच नाही तर बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली आहे. एका बाजुला शरद पवारांची मुलगी आहे तर दुसर्या बाजुला सून लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.
या वेळेस लोकसभा निवडणुकीत कोणाची हवा किंवा लाट दिसत नाहि आहे. हि निवडणुक पुर्णपणे स्थानिक मुद्यावर होत आहे. विविध मतदारसंघाच्या अभ्यासाच्या आधारे असे लक्षात येते की, या वेळेस महाराष्ट्रात भाजपाला २० ते २४ जागावरच समाधान मानावे लागणार आहे.
महाराष्ट्रातुन भाजपाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पक्ष फुटी आहे. पक्ष फुटी मुळे शरद पवार गट आणि उध्दव ठकरे गट यांना लोकांचे भावनिक समर्थन मिळत आहे. याचा परिणाम विधान सभेवर सुद्धा दिसून येण्याची शक्यता आहे.