त्याला चुना कसा लावतात हेसुद्धा माहीत नाही, वेळ आल्यावर मी त्याला चुना लावणार

गुलाबराव पाटील

मंडळी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गुवाहाटीला नेऊन उध्दव ठाकरेंविरोधात बंड केला होता. ज्यामध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटीलसुद्धा सामील आहे.

 

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

 

गुलाबराव पाटलांसारख्या निष्ठावान शिवसैनिकाने पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांच्यावर बोचरी टीका करत

 

” गुलाबराव पाटील यांना पान टपरीवरून मंत्री केलं”

 

अस विधान केल होत. मात्र गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये आमदारांच्या चर्चेदरम्यान गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना चांगलच धारेवर धरलं आहे. संजय राऊत यांना सुनावत गुलाबराव पाटील म्हणाले की,

 

” जेवढा संघर्ष आम्ही शिवसेनेसाठी केला आहे, तेवढा संजय राऊत यांनी केला आहे का? १९९२ साली झालेल्या शिवसेनेच्या एका आंदोलनात मी आणि माझे ३ भाऊ माझ्या वडिलांसोबत कितीतरी दिवस कारागृहात होतो हे तरी त्यांना माहिती आहे काय? ४७ डिग्री तापमान असतांना जळगावमध्ये मेळावा घेऊन ज्याप्रमाणे आम्ही ३५ जोडप्यांचे विवाह केले तशी हिम्मत संजय राऊत करतील का? आंदोलन करत असताना किती तरी किलोमीटरचा पायदळ प्रवास मी केला आहे तेव्हा संजय राऊत कुठे होते? अर्ध्या रात्री कार्यकर्त्यांचे फोन येतात म्हणून जसे आम्ही तयार असतो तसे राऊत राहतात का? शिवसेना घडवण्यात ऐंशी टक्के वाटा जरी बाळासाहेब ठाकरेंचा असला तरी २० टक्के वाटा हा आमचा आहे. आमच्याविरोधात आमची प्रेतयात्रा काढून निदर्शने केली जात आहे. मात्र जनता आमच्या पाठीशी आहे.”

 

अस म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना चांगलच सुनावलं आहे. 

 

शिवसेना संपणार ??

 

त्याला मी चुना लावणार- गुलाबराव पाटील

 

गुवाहाटीतील हॉटेलमध्ये स्थित बंडखोर आमदारांशी चर्चा करत असताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका करताना म्हटलं की,

 

” संजय राऊत यांना पानाला चुना तरी लावता येतो का? मात्र काही वेळ आल्यानंतर संजय राऊत यांना मी चुना लावल्याशिवाय राहणार नाही”

 

असा टोला गुलाबराव पाटीलांनी राऊतांवर लगावला आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *