भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास

काल चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर गद्दारी केल्याचा आरोप केला..

गद्दारी नक्की कुणी कुणाशी केली हे बघू या…

भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास…👇

ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्रच्या विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला १०५ जागा, शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४जागा, कॉंग्रेसला ४४ जागा आणि इतरांना काही जागा मिळाल्या. भाजप – शिवसेना युती करून निवडणूक लढले होते. त्या मुळे भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना खात्री होती की आपला म्हणजे मीच मुख्यमंत्री होईल आणि गेल्या५ वर्षाप्रमाणे शिवसेनेला फारसं महत्व न देता आपण सरकार चालवू. शिवसेना आपल्याशिवाय कुठेच जावू शकत नाही. शिवसेना तयार झाली नाही तर राष्ट्रवादी आहेच, गेल्या वेळेप्रमाणे बाहेरून पाठिंबा द्यायला. परंतु उद्धव ठाकरेंनी निकालाच्या दुसर्‍या दिवशी जाहीर केलं की युती सरकारमध्ये आम्हाला सत्तेत समान वाटा पाहिजे, आमचं अमित शहा यांच्या बरोबर ठरले आहे, आम्हाला सुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री पाहिजे. अन्यथा आमच्याकडे दूसरा पर्याय आहे. भाजपला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की असे काही होईल. काही अपक्षांच्या मदतीने 116 पर्यन्त आकडा भाजपचा होत होता. त्या पुढे काही त्यांची गाडी सरकायला तयार नव्हती. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर बोलणी सुरू केली. यात प्रामुख्याने संजय राऊत आणि जेष्ठ नेते शरद पवारांनी पुढाकार घेतला. मग भाजपला कळून चुकलं की आता आपलं सरकार काही येत नाही. तरी सुद्धा त्यांनी राज्यपाल कोशारींच्या मदतीने शेवट पर्यन्त प्रयत्न केले. परंतु ते सर्व निष्फळ ठरले. किंवा असे म्हणता येईल की पवारांसारख्या जेष्ठ आणि मुत्सदी नेत्याने मोदी – शहा – फडणवीस – कोशारी यांच्यावर मात केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे सरकार स्थापन झाले. सवयी प्रमाणे भाजप नेते शिवसेनेने गद्दारी केली , आम्हालाच जनाधार मिळाला आहे असे सांगायला सुरवात केली. फडणवीस तर मीच कायमचा मुख्यमंत्री असे स्वत:च्या फेसबुकवर लिहू लागले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *