मंडळी राज ठाकरे नावाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये चांगल्याच ताकदीने चालू आहे. १ मे ला राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजातील कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं गृहखात आता ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. राज ठाकरे यांची सभा चालू असताना मुस्लिम बांधवांचे अजाण पठण भोंग्यावर सुरू झाले आणि ते राज ठाकरे यांच्या कानावर आले, तेव्हा राज ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करणारे विधान करून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे
आज थोड्याच वेळामध्ये गृहमंत्री आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्यामध्ये राज ठाकरे यांच्या सभेच्या अनुषंगाने बैठक होणार आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास करून कारवाई होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास कायदे तज्ञांकडून केला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने कायदे तज्ञांना राज ठाकरे यांच्या भाषणावर त्यांचे ओपिनियन मागितले आहे आणि त्याबद्दलचा अहवालसुद्धा सादर करण्याचे आदेश दिल्या गेले आहे. राज ठाकरे यांच्यावर आयपीसी २९४ आणि आयपीसी २९५ कलमनुसार कारवाई होऊ शकते का? याचासुद्धा अहवाल गृहखात्याने मागितला आहे.
रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड
नेमकं काय बोलले होते राज ठाकरे ?
सभा सुरू झाली आणि श्रोत्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घोंघावत होता. अचानक काही लोकांनी सभेमध्ये गोंधळ घातला आणि राज ठाकरेंचा राग अनावर झाला. त्या गोंधळ घालणाऱ्या लोकांना खोचक भाषेमध्ये धमकावतना त्यांनी म्हटलं की,
” ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे. इथे जर गोंधळ कराल, तर चौरंग करून घरी पाठवू लक्षात ठेवा.”
राज ठाकरे यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यावरून त्यायांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र
- मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनवीन राणा
- अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद
- पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir