काटोलमधल्या देशमुखांची इमानी झुंज

मंडळी तुम्ही अनुभवलं असेल की माणसाला सत्तेची लालूस लागली की तो कुठल्यापन स्तरापर्यंत जातोच जातो. हा पण ती सत्तेची इर्षा ,तो मोह हा खरच समाजासाठी आहे की स्वतःसाठी आहे हे पण महत्वाच. पण काटोल मतदारसंघातील देशमुखांच्या बाबतीत जरा वेगळच घडलय. कारण एकीकडे याच मतदार संघाने या महाराष्ट्राला अनेक मंत्रिपदाची भूमिका बजावणारा अन पहिल्याच प्रयत्नात अपक्ष उभं राहून निवडून येणारा रणझुंजार अनिल देशमुखांसारखा नेता दिला. तर दुसरीकडे आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडून येणारा मात्र विदर्भातील गोरंगरिबांचे प्रश्न आपलंच सरकार सोडवू शकत नाही म्हणून अवघ्या चार वर्षांची कारकीर्द बजावून भाजपच्या क्रूर शासकीय धोरणाला लाथ मारून आमदारकीच्या पदाचा राजीनामा देऊन जनतेच्या बाजूने उभा राहणारा आशिष देशमुखांसारखा नेता दिला.

मा. अनिल देशमुखांची राजकीय कारकीर्द

मंडळी मा. अनिल देशमुख यांनी तत्कालीन गृहमंत्री पदाचा राजीनामा जरी दिला असला तरीपण त्यांची राजकीय कारकीर्द वाचल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. १९९५ साली मा. अनिल देशमुख हे आपल्या पहिल्याच प्रयत्नात अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि महायुती आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री ,शालेय शिक्षण व उच्च तंत्रशिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्रीसुद्धा झाले.१९९९ साली मा. शरद पवार साहेबांनी स्वतःचा स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारल्यानंतर मा. अनिल देशमुख साहेब काटोल मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले आणि त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री, शालेय शिक्षण माहिती व जनसंपर्क मंत्रीपद देण्यात आलं. नंतर २००१ मध्ये कॅबिनेट मंत्री , राज्यउत्पादन शुल्क अन्न औषधी व द्रव्य प्रशासन मंत्री ,२००४ मध्ये कॅबिनेट मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री, २००९ मध्ये नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि असे अनेक मंत्रीपद त्यांनी आपल्या विकासकामांच्या आणि नेकीच्या जोरावर मिळवली. पण २०१४ च्या निवडणूकिमध्ये त्यांना आपल्याच पुतण्याकडून म्हणजे मा. आशिष देशमुख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र २०१९ मध्ये मा. अनिल देशमुखांनी पुन्हा आपल्या आमदारकीच्या पदाची बाजी मारत विरोधकांना पाहत ठेवलं आणि महायुतीच्या सरकारमध्ये गृहमंत्री पद मिळबल.

सत्तेला लाथ मारून विदर्भासाथी उभा राहणारा विदर्भवादी

मंडळी तुम्ही सत्तेसाठी जीव घेणारी , मतांसाठी आठवडाभऱ्याचा किराणा वाटणारी आणि रातोरात दारूच्या बाटल्या वाटून जनतेला विकत घेणारी अन त्याच जनतेच्या पोटावर सत्तेत आल्यानंतर लाथ मारणारी क्रूर नेत्यांची जमात बघितली असेल. मात्र आपलाच पक्ष आपल्या विदर्भातील लोकांवर अन्याय करतो आहे म्हणून जनतेच्या बाजूने उभं राहून आमदारकीच्या पदाच्या राजीनामा देऊन इथल्या भारतीय जनता पक्षाच्या छातीवर बसणारा नेता म्हणजे मा. आशिष देशमुख यांच्याबद्दल तुम्ही कधी वाचलंय का? नसेल वाचलं तर नक्की वाचा. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. रणजित देशमुखांचे हे चिरंजीव आहेत. मा. आशिष देशमुख यांनी २०१३ साली स्वतंत्र विदर्भासाठी बेमुदत आंदोलन केल होत. २०१४ ला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आपल्याच काकांविरोधात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. अनिल देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि अनिल देशमुखांचा १९९५ पासून असलेला काटोल मतदार संघ नावाचा गड काबीज करून आमदार पदावर निवडून आले. मात्र आपलाच भारतीय जनता पक्ष आपल्याच विदर्भातील लोकांवर अन्याय करतो आहे म्हणून त्यांनी अवघ्या ४ वर्षांमध्ये आमदार पदाचा राजीनामा दिला आणि जनतेच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले.

असे हे काटोल मतदारसंघासाठी , विदर्भासाठी झटणारे देशमुख नावाचे म्हणजे रणझुंजार काका पुतणे.

1 thought on “काटोलमधल्या देशमुखांची इमानी झुंज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *