मी भाजपच्या पाठिंब्यामुळे आमदार झालो- शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट.

               मंडळी सध्याच्या परिस्थितीत हा महाराष्ट्र तीन पक्षाच्या एकत्रिकरणानं स्थापन झालेल्या सरकारवर चालत आहे. ते पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. मात्र बऱ्याचदा या तीनही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपली घुसमट होत असल्याचं मत व्यक्त केलंय. 
         ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार संशयांच्या चौकटीत नेहमीच दिसून आलंय. हिंगोली मतदारसंघातील शिवसेना खासदार मा. हेमंत पाटलांच महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असलेल्या घुसमटीच विधान असो की आता शिवसेना आमदार शहाजी पाटील यांचे वादग्रस्त विधान असो.

आम्हाला कुणी विचारत नाही – शिवसेना आमदार शहाजी पाटील

                   महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्हाला कुणी विचारत नाही असा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील एकही मंत्री नाही. आमच्यापैकी कुणाचाही विचार त्यांनी केला नाही अशी नाराजी त्यांनी एका सभेदरम्यान व्यक्त केली.
            मला निवडणूकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे वेळोवेळी फोन यायचे. काही अडचण असल्यास आवर्जून विचारायचे. माझ्या तालुक्यात शिवसेनेचे फक्त ११०० मत मला मिळाले. भाजपच्या पाठिंब्याने मी आमदार झालो अस  विधान करून त्यांनी स्वतःच्याच पक्षाला अर्थात शिवसेनेला चांगलाच आहेर दिलाय. मी जरी शिवसेनेकडून पहिल्यांदा निवडून आलो असलो तरी शिवसेनेकडून गेली २५ ते ३० वर्षे निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचासुद्धा विचार मंत्रिमंडळासाठी केला नाही अस मत त्यांनी बोलताना व्यक्त केलं.  
          मंडळी या सर्वावरून एक लक्षात येत की महाविकास आघाडी सरकारच्या घरातलीच भांडी वाजताना दिसून येत आहे. हे सरकार चालवणे, जनतेचे प्रश्न मिटवणे, विरोधीपक्षाचे वार झेलने. या सर्व गोष्टी महाविकास आघाडी सरकार कशाप्रकारे पार पाडेल याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *