मंडळी राजकीय वादावादी हे विरोधी पक्षांमध्ये असतेच असे नाही. ते कधीकाळी स्वपक्षातील लोकांमध्येपण असते. असाच काही प्रकार राज्यसरकारमधील नेत्यांमध्ये आणि खुद्द राज्यसरकारमधील एक घटक असलेले संजय राऊत यांच्यात झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारवर टीका करत म्हटलं की,
” दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारने योग्य ती खबरदारी न घेतल्याने भारतीय देशात कोरोना पसरवण्यासाठी हे दोन राज्य जबाबदार आहेत.”
अस विधान त्यांनी केलं. मोदी साहेबांच्या या वक्तव्याचा विरोध शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. मात्र त्याबरोबरच त्यांनी राज्यसरकारमधील नेत्यांनासुद्धा चांगलाच टोला लगावला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारवर वादग्रस्त विधान केल्यानंतर संजय राऊत यांनी मोदींसाहेबांच्या या विधानाचा विरोध केला आहे. सोबतच त्यांनी राज्यसरकारमधील नेत्यांनासुद्धा चांगलाच टोला लावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनासंदर्भात महाराष्ट्रच कौतुक केलं होतं.
धारावीतील लोकांनी योग्य रित्या कोरोना परिस्थिती हाताळल्यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्राचं विविध भागातून कौतुक केल्या गेलं होतं. मात्र अस असूनसुद्धा मोदींसाहेबनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. याचा विरोध तर संजय राऊत यांनी केलाच. मात्र केंद्रसरकार विरोधात दर वेळेला मीच बोलावं हा मी ठेका घेतलेला नाही. असा टोला त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लगावला आहे.
संजय राऊत यांच्या या विधानावर आता इतर नेतेमंडळी काय प्रतिक्रिया देतात. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.