मंडळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसोबत पंगा घेणे रवी राणा यांना चांगलच महागात पडलं आहे. राज ठाकरेपासून सुरू झालेला हनुमान चालीस्याचा वाद राणा दाम्पत्यापर्यंत पोहचला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीस्याच वाचन मातोश्रीवर करू अस चॅलेंज शिवसेनेला दिल्यानंतर हा वाद चांगलाच उफाळून आला.
राणा दाम्पत्य मुंबईत दाखल होताच पोलीस प्रशासनाने यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही अटक केली होती. न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेली.
उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा
मात्र आता जामीन झाल्यानंतरसुद्धा राणा दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांच्या मनमानीतून सुटका होणे कठीण दिसत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खारमधील रवी राणा यांच्या फ्लॅटच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर रवी राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलत असताना रवी राणा म्हणाले की,
” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या फ्लॅटसाठी नोटीस पाठवली. कारण त्यांना इतर काम राहली नसणार आणि तसेही संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासारखे माझे मुंबईत १० फ्लॅट नाही. त्यांनी खुशाल चौकशी करावी.”
असा निशाणा रवी राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर साधला आहे.
सौरव गांगुली करणार भाजपमध्ये प्रवेश
मुख्यमंत्र्यांना दुसरं काम राहलेल नाही – रवी राणा
प्रसार माध्यमांशी बोलत असतांना रवी राणा पुढे म्हणाले की,
” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लोकांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खारमधील रवी राणा यांच्या फ्लॅटच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर रवी राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे. मालमत्ता जप्त करण्याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही काम उरले नाही. म्हणून ते या प्रकारचे वर्तन करत असणार.”
असा टोला रवी राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर लगावला आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राज ठाकरेंच्या सभेवर गृहखात कारवाई करणार
- अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे
- राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत
- उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir