मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध आपण बघत आहोत. महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची चौकशी लादत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि संजय राऊत यांच्यामध्ये संशयित घमासान सुरू होत. याआधी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावर ईडीने आपला हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना अचानक झटका बसला आहे.
भारतीय जनता पक्षाकडून संजय राऊत यांचा एकप्रकारे वचपाच काढण्यात आला असावा असे म्हणणं वावग ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करून केंद्र सरकारमध्ये बसून असलेल्या भारतीय जनता पक्षाने संजय राऊत यांचा एक प्रकारे वचपा काढला आहे. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी आपल मौन सोडलं आहे. यावर ते म्हणाले की,
” कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. मी आता टिव्हीमध्ये पाहिलं की मालमत्ता जप्त केली आहे. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे काहीतरी म्हणतात ना, एक रुपया जरी गैरव्यवहाराचा आमच्या खात्यामध्ये आला असेल आणि त्यामधून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत.”
अस संजय राऊत यांनी भाजप वर टीका करताना म्हटल आहे. मात्र आता चिघळलेल हे सर्व प्रकरण कुठलं वळण घेईल. यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.