एका पक्षाच्या वतीने पंतप्रधान बोलत होते ते पाहून मला दुःख झाले- सुप्रिया सुळे

            मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीसरकारविरोधी वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेमध्ये बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,” भारतीय देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याच मुख्य कारण हे दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकार आहे. मात्र संजय राऊत यांनी मोदींसाहेबांच्या या विधानाचा चांगलाच कडाडून विरोध केला आहे.

            पण संजय राऊत यांनी यासोबतच महाविकास आघाडीमधील नेत्यांना आपल्या वक्तव्यातून चांगलाच टोला लगावला आहे. हरवेळी केंद्रसरकारविरोधात बोलण्याचा मी ठेका घेतलेला नाही. अस विधान त्यांनी केलं आहे.

            संजय राऊतांच्या या विधानाने महाविकास आघाडीमधील इतर नेत्यांनीसुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या वक्तव्याचा विरोधात मौन सोडायला आता सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक असलेल्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीसुद्धा मोदी साहेबांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे.

            काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारवर वादग्रस्त विधान केल्यानंतर संजय राऊत यांनी मोदींसाहेबांच्या या विधानाचा विरोध केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनासंदर्भात महाराष्ट्रच कौतुक केलं होतं.

               धारावीतील लोकांनी योग्य रित्या कोरोना परिस्थिती हाताळल्यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्राचं विविध भागातून कौतुक केल्या गेलं होतं. मात्र अस असूनसुद्धा मोदींसाहेबनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

               यावर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं की,

          ” लोकसभेमध्ये बोलत असतांना मोदीसाहेब संपूर्ण भारतीय देशाचे प्रधानमंत्री असूनसुद्धा एकाच पक्षाच्या वतीने बोलत होते. याचे मला फार वाईट वाटले.”

            अस विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. आता यावर भारतीय जनता पक्षाची काय प्रतिक्रिया येते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *