मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.
ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.
भाजप खासदाराच राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन
मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिल्यानंतर आता मुंबईमधील उत्तर भारतीय विकास सेनेतील लोकांनीसुद्धा राज ठाकरे यांचा विरोध केला आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे पदाधिकारी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की,
” गेल्या २००८ पासून आम्ही उत्तर भारतीय लोक मुंबईमध्ये राहत आहोत. मात्र राज ठाकरे यांनी नेहमीच आमच्यावर अन्याय केला आहे. सर्व प्रांताची भाषा ही महान असते. मात्र त्यांनी आमच्या भाषेचा अपमान केला आहे. आमच्या लोकांना त्यांनी अक्षरशः मारहाण केली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की, राज ठाकरे हे भाऊ असतील तर आम्ही भैय्या लोक आहोत. सगळे मिळून भाईचाऱ्याने राहुयात. “
अस आव्हान मुबंई उत्तर भारतीय विकास सेनेन राज ठाकरे यांना केलं आहे.
अयोध्येत यायचं असेल तर राज ठाकरेंना माफी मागावी लागेल – मुंबई उत्तर भारतीय विकास सेना
मुंबई उत्तर भारतीय विकास सेनेन पुढे बोलताना म्हटलं की,
” आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरे यांनी माफी मागावी अस पत्र लिहिलं आहे. कारण त्यांनी माफी मागितली नाही तर हा उत्तर भारतीय लोकांचा अपमान असेल.”
अस मुंबई उत्तर भारतीय सेनेन म्हटलं आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र
- जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे
- भाजप खासदाराच राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रॅली काढून शक्ती प्रदर्शन
- अजाण लावली नाही म्हणून खुश झालो अस समजू नका- राज ठाकरे
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir