मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात धार्मिक राजकारण करून संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रातील मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हनुमान चालीसा प्रत्येक मस्जिदीपुढे लावण्यात येईल.
अस विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.राज ठाकरेंच्या या विधानाने समाजामध्ये धार्मिक तेढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरे यांना पुरेस राजकीय यश प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी हा राजकारणातील धार्मिक फंडा वापरला असावा.
या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशीकमध्ये सर्व धार्मिक स्थळी भोंगे लावण्याअगोदर पोलिसांची परवानगी घ्यावी असे आदेश दिले आहेत. अन्यथा चार महिन्यांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितल. मात्र दीपक पांडे यांच्या आदेशांचा विरोध नाशिकचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला आहे.
दुप्पट आवाजात भोंगे वाजवू – दिलीप दातीर
मंडळी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाटील यांनी नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांवरचे भोंगे लावण्याअगोदर पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यायचे सांगितल्यानंतर नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दीपक पाटील यांच्या आदेशांचा कडाडून विरोध केला आहे.
ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते की,
“जर ३ मेपर्यंत नाशिकमधील मस्जिदींवरचे भोंगे प्रशासनाने हटवले नाही, तर आम्ही प्रत्येक मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याशिवाय राहणार नाही. मा. राज साहेबांचा आदेश आम्हाला अंतिम आदेश आहे. आम्ही नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशांना मानत नाही. जर मुस्लिमांना भोंग्यावत अजाण लावायची परवानगी मिळत असेल ,तर आम्हाला हनुमान चालीसा लावायची का नाही ?”
असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. मात्र दातीर यांच्या या वक्तव्यावर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.