अजाण लावणारे ऐकत नसतील तर मनगटातली ताकद दाखवू – राज ठाकरे

अजाण

मंडळी राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये चांगलच चर्चेत असलेलं नाव आहे. मुंबई आणि ठाणे येथे सभेमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या अजाण-भोंग्याच्या भूमिकेवरून संपूर्ण राजकीय क्षेत्र व्यस्त झालं आहे.

 

राज ठाकरे यांची ठाणे येथील सभा झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागलेली होती की येणारी सभा कुठे व कधी होणार ? अखेर राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद  येथे पार पडली. सभेआधी ही सभा होणार की नाही? सभेला पोलीस प्रशासन परवानगी देणार की नाही? अस सर्वांना वाटत होतं.

 

राज ठाकरेंच्या सभेला १५० पुरोहित शंखनाद करतील

 

काल औरंगाबाद येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमध्ये लाखो लोकांचा सैलाब उसळून पडला. सभा सुरू झाली आणि श्रोत्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घोंघावत होता. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर पूर्ण भाषणभर टीका केली.

 

मात्र जेव्हा चालू भाषणामध्ये राज ठाकरेंना मुस्लिम बांधवांची अजाण ऐकू आली तेव्हा राज ठाकरे यांनी खुलेपणाने दंगल घडवण्याचे अप्रत्यक्ष निर्देश दिले. अजाण ऐकू येताच राज ठाकरे म्हणाले की,

 

” पोलीस प्रशासनाने या जरा लोकांना सांगावं अन्यथा ते अजाण थांबवत नसतील तर त्यांच्या तोंडात बोळा घालावा. ते ऐकत नसतील तर आमच्यापण मनगटात ताकद आहे. एकदा होऊन जाऊ द्या जे काय व्हायचं ते.”

 

अशा शब्दात राज ठाकरे यांनी काल खुलेपणाने महाराष्ट्रात दंगल घडवायचे निर्देश दिले. 

 

राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

 

 

महाराष्ट्रातील भोंगे हटवा अन्यथा काही पण होऊ शकत – राज ठाकरे 

 

राज ठाकरे पुढे बोलताना ते म्हणाले की,

 

” ज्या प्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या सरकारने भोंगे खाली उतरवले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा भोंगे उतरवण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्रात काही घडलं तर मला माहिती राहणार नाही.”

 

असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. मात्र आता विरोधी पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *