मंडळी सद्ध्या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रामध्ये चांगलाच गदारोळ माजत आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा भोंग्याचा मुद्दा असो, राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा मुद्दा असो, अकबर उद्दीन ओवेसी यांचा औरंगजेबाच्या कबरीवर हार चढवणे असो की मग केतकी चितळेचा शरद पवार यांची खिल्ली उडवण्याचा मुद्दा असो.
सगळीकडे या सर्व मुद्द्यांचीच चर्चा होतांना आपल्याला दिसते आहे. मात्र आता आणखी एक नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना झालेली मारहाण.
१० मिनिटं पोलीस हटवा अकबर उद्दीन ओवेसी ला औरंगजेबाकडे पाठवू – नितेश राणे
पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रसंग घडला. भाजपाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या स्मृती इराणी यांना महागाई विरोधात पत्र देण्यासाठी गेल्या असता त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना भाजपाला चांगलाच दम दिला आहे. त्या म्हणाल्या की,
” पुण्यामध्ये भाजप आयोजित स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामध्ये आमच्या पक्षाच्या महिला ह्या फक्त महागाईच्या विरोधात स्मृती इराणी यांना निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. मात्र त्यांना उपस्थित पोलिसांनी तिथे बसू दिल नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. मात्र महिलांवर हात उचलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर यापुढे कुणी पण महिलांवर हात उचलताना मला आढळला तर मी त्याचे हात तोडून हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही.”
अस सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं.
नवनवीन राणांवर झालेल्या अन्यायावर सुप्रिया सुळे का बोलल्या नाही ? – देवेंद्र फडणवीस
सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केलेल्या टिकेनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रतिउत्तर दिल आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,
” जेव्हा नवनीत राणा यांच्यावर अन्याय करण्यात आला त्यावेळेस त्या काही बोलल्या नाही. आमच्याही पक्षाच्या महिलांना जेव्हा मारहाण झाली तेव्हापण त्या काहीच बोलल्या नाही. म्हणून सुप्रिया ताईंनी जरा विचार करून बोलावं.”
असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- शिवसेना आमदार रमेश लटके यांच अकाली निधन
- राज ठाकरेंनी धमकीच पत्र आल्याची स्टंटबाजी बंद करावी – संजय राऊत
- राज ठाकरे भाऊ असतील तर आम्ही भैय्या लोक आहोत – मुंबई उत्तर भारतीय विकास सेना
- उध्दव ठाकरेंची तक्रार दिल्लीला जाऊन करणार- नवनीत राणा
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir